घरमनोरंजनबहुचर्चित रामायण सिनेमात बिग बींची एन्ट्री?

बहुचर्चित रामायण सिनेमात बिग बींची एन्ट्री?

Subscribe

नितेश तिवारी दिग्दर्शित रणबीर कपूरच्या ‘रामायण’ सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे. सध्या सिनेमाचं कास्टिंग जोरात सुरु आहे. रामायणातील विविध भूमिकांसाठी लोकप्रिय अभिनेत्यांना सिनेमात कास्ट केलं जातंय. बॉलीवूडसह संपूर्ण सिनेसृष्टीमध्ये सध्या ‘रामायण’ या चित्रपटाची चर्चा आहे. रणबीर कपूर मुख्य भूमिकेत असणाऱ्या या चित्रपटाची सध्या प्रेक्षकांना बरीच उत्सुकता लागून राहिली आहे. सध्या सिनेमाचं स्टार कास्टिंग सुरु असून विविध भूमिकांसाठी तगडे अभिनेते आणि अभिनेत्र्यांची निवड केली जातेय. त्यातच आता या सिनेमाचा अभिनेते अमिताब बच्चन देखील झळकरणार असल्याची माहिती समोर आली आहे.

रामायण या चित्रपटामध्ये रणबीर कपूर हा रामाची भूमिका साकारणार असून अभिनेत्री साई पल्लवी ही सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यातच आता अमिताभ देखील या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून बीग बी यामध्ये कोणती भूमिका साकारणार हा प्रश्न सध्या सगळ्यांना पडला आहे. पण या चित्रपटामध्ये बीग बी हे अत्यंत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

- Advertisement -

राजा दशरथाची भूमिका साकारणार बिग बी?
टाईम्स नाऊच्या वृत्तानुसार, रामायण या सिनेमात अमिताभ बच्चन हे राजा दशरथाची भूमिका साकारणार असल्याची माहिती समोर येत आहे. या भूमिकेसाठी सिनेमाची टीम देखील अमिताभ यांना कास्ट करण्यासाठी उत्सुक असल्याचं म्हटलं जात आहे. पण रामायण सिनेमात अमिताभ बच्चन ही भूमिका साकारणार की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. असं असलं तरीही रामायण या सिनेमात अमिताभ यांना दशरथाच्या भूमिकेत पाहायला प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.

‘रामायण’ ची स्टार कास्ट
रामायण या सिनेमामध्ये श्रीरामाच्या भूमिकेत रणबीर कपूर तर सीतेच्या भूमिकेत साई पल्लवी झळकणार आहे. या सिनेमात रावणाची भूमिका केजीएफ फेम यश साकारणार आहेत. तर हनुमान ही भूमिका सनी देओल साकारणार आहे, असं म्हटलं जात आहे. तर रिपोर्टनुसार, कैकेयी ही भूमिका लारा दत्ता साकारणार आहे. तसेच बिभीषणाच्या भूमिकेत बॉबी देओल, सेतुपती बीभिषणाच्या भूमिकेत दिसणार आहे. नितेश तिवारी यांचा रामायण हा सिनेमा 2025 मध्ये सिनेमागृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं म्हटलं जात आहे. रणबीरच्या रामायण या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

- Advertisement -

‘रामायण’ कधी रिलीज होणार?
नितेश तिवारी मार्च 2024 पासून ‘रामायण’चे शूटिंग सुरू करणार आहेत. हा चित्रपट तीन भागात बनवला जाणार आहे. असे वृत्त आहे की निर्माते दिवाळी 2025 पूर्वी चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करतील आणि त्यानंतरच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख उघड होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -