Sunday, April 11, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन 'अनुष्का के पास विराट खोली है.' विरुष्कावर बिग बींची विनोदी पोस्ट

‘अनुष्का के पास विराट खोली है.’ विरुष्कावर बिग बींची विनोदी पोस्ट

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड चित्रपटसृष्टीचे महानायत अमिताभ बच्चन सोशल मीडियावर अधिक सक्रिय असतात. शूटिंगमधून निवांत वेळ मिळाला की बिग बी आपल्या कविता, फॅशन किंवा ट्रेंड फॉलो करताना दिसतात. आपल्या आयुष्यातील अनेक हॅप्पी, सॅड मुव्हमेंटे ते चाहत्यांसह शेअर करतात. सोशल मीडियावरील ट्रेंड आणि मजेशीर विनोद फॉलो करण्यात बिग बी आघाडीवर आहेत. यातच बिग बींनी ट्विटरवर आता विरुष्का जोडीवर एक मजेशीर पोस्ट केली आहे.

या पोस्टवरील कमेंट वाचून सोशल मीडियावर चाहते पोटभरून हसत आहेत. अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली यांच्यावर एक विनोद शेअर केला आहे. एक फोटो शेअर करत त्यांनी एक मजेदार अशी कॅप्शनही लिहिली आहे. या मजेशीर कॅप्शनमध्ये बिग बींनी म्हटलंय की, ‘रंग अजून उतरला नाही आणि सणाचे विनोद अजूनही बंद झालेले नाहीत. अनुष्का-विराटला आदरासह. Anushka has a huge apartment ! पण हेच हिंदीमध्ये त्याचे भाषांतर केले तर- अनुष्का के पास विराट खोली है.’ त्यामुळे विराट आणि अनुष्कावरून अमिताभ बच्चन यांनी केलेला हा मजेशीर विनोद सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

- Advertisement -

अनेक युजर्स बिग बींनी केलेल्या विनोदाची मजा लुटताना दिसतायत. जानेवारी २०२१ रोजी पहिल्यांदा विराट-अनुष्का आई-बाबा झाले. त्यांनंतर ही जोडी नेहमीच चर्चेत राहिली आहे. मुलगी वामिकाच्या जन्मानंतर अनुष्का पुन्हा कामावर परतली आहे. तर विराटही आपल्या करियरमध्ये बिझी झाला. मात्र दोघे नेहमी मुलगी वामिकासह स्पॉट होत असतात. दरम्यान विमानतळावरीलही विरूष्काचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोत अनुष्काच्या हातात वामिका आहे तर विराट सर्व बॅग्स सांभाळताना दिसतोय. हे फोटो अहमदाबादमध्ये झालेल्या इंग्लंड विरूद्धच्या टी-20 सीरिजदरम्यानचे आहेत. यावेळी सीरिज संपूण टीम इंडियाचे खेळाडू घरी परत होते. यावेळी विराटसह अनुष्का व वामिकाही होती. आता टीम इंडिया पुढच्या मॅचसाठी पुण्याला रवाना झाली आहे. यादरम्यान पून्हा विरूष्का आणि वामिकाला एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आले.


- Advertisement -

 

- Advertisement -