घरमनोरंजन'तू चीज बड़ी है...' ब्लू टिक पुन्हा मिळाल्याच्या आनंदात अमिताभ बच्चन यांनी...

‘तू चीज बड़ी है…’ ब्लू टिक पुन्हा मिळाल्याच्या आनंदात अमिताभ बच्चन यांनी एलॉनसाठी गायले गाणं

Subscribe

ट्विटरने अमिताभ बच्चन यांच्यासह काही बॉलिवूड कलाकारांच्या वेरिफाइट अकाउंटवरुन ब्लू टिक हटवले. अशातच आता ब्लू टिक केवळ त्याच लोकांन मिळत आहे, जे यासाठी पेमेंट करणार आहेत. ब्लू टिक हटवल्यानंतर काही लोकांनी यावर नाराजी व्यक्त केली होती. काही लोकांनी ट्विटरला ब्लू टिकसाठी पैसे न दिल्याने असे झाल्याचे म्हटले. अशातच बिग बी यांनी एक पब्लिक अपील आणि मजेशीर पद्धतीने ट्विटवरवरुन त्यांचे ब्लू टिक पुन्हा देण्याची मागणी केली होती. त्याचसोबत त्यांनी असे ही म्हटले होते की, त्यांनी पेमेंट केले आहे. परंतु तरीही त्यांना ब्लू टिक परत मिळालेले नाही.

अमिताभ बच्चन यांनी आपल्या ट्विटमध्ये असे लिहिले होते की, “ए twitter भइया ! सुन रहे हैं ? अब तो पैसा भी भर दिये हैं हम … तो उ जो नील कमल होत है ना, हमार नाम के आगे, उ तो वापस लगाय दें भैया , ताकि लोग जान जायें की हम ही हैं – Amitabh Bachchan .. हाथ तो जोड़ लिये रहे हम । अब का, गोड़वा जोड़े पड़ी का ??” बिग बी यांचे हे अपील पाहून ट्विटरने त्यांचे पुन्हा अकाउंट वेरिफाय केले.

- Advertisement -

पुढील ट्वीटमध्ये अमिताभ बच्चन यांनी असे लिहिले की, मला माझे ब्लू टिक मिळाले आहे. त्याचसोबत असे ही म्हटले की, ए Musk भैया ! बहुत बहुत धन्यवाद देत हैं हम आपका ! उ , नील कमल लग गवा हमार नाम के आगे ! अब का बताई भैया ! गाना गये का मन करत है हमार ! सनबो का ? इ लेओ सुना :”तू चीज़ बड़ी है musk musk … तू चीज़ बड़ी है, musk”

Tweet:

- Advertisement -

यावरच अमिताभ बच्चन थांबले नाहीत त्यांनी आखणी एक ट्वीट केले आणि लिहिले की, ‘ट्विटर मौसी! गजब होए गवा !! उ, नील कमल (ब्लू टिक) लगाए के बाद, नील कमलवा अकेले पड़ा-पड़ा, घबरात रहा! तो हम सोचा, तनिक ओका कंपनी देई दें. ते बग़ल में ओके, हम अपना झंडा (तिरंगा) गाड़ दिये! अरे, गाड़े में टाइम लगा नाहीं, की कमलवा भाग गवा! बताओ! अब? का करी?”

Tweet:

खरंतर अमिताभ बच्चन यांनी आणखी एक ट्विट करत अशा लोकांना उत्तर दिले आहे जे बिग बी यांना ट्विटरला मावशी म्हटल्याने मस्करी करत होते. अमिताभ यांनी ट्विटमध्ये त्याला का मावशी म्हटले गेले याचे कारण सांगितले होते. त्यांनी लिहिले की, “इ, लेओ! और मुसीबत आई गई! सब पूछत है, ‘ट्विटर के तुम ‘भैया’ बुलाय, रहेओ! अब ‘मौसी’ कसे होई गई? तो हम समझावा की, पहले ट्विटर के निसानी, एक ठो कूकुर (कुत्ता) रहा, तो ओका भैया बुलावा. अब उ फिर से, एक फुदकिया बन गवा है, तो फुदकिया तो चिड़िया होत है ना , तो मौसी.”

Tweet:

या व्यतिरिक्त ट्विटरने अशा अकाउंटचे सुद्धा ब्लू टीक पुन्हा दिले आहे ज्यांचे निधन झालेयं. यामध्ये चॅडविक बोसमॅन, कोबे ब्रायंच आणि मायकल जॅक्सनचा सुद्धा समावेश आहे. या व्यतिरिक्त परदेशातील नामांकित व्यक्ती जसे की, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंम्प, बास्केटबॉल प्लेअर लेब्रॉन जैम्स आणि लेखक स्टीफन किंग यांच्या नावाचा समावेश आहे.

 


हेही वाचा- ‘ऐ Twitter भइया…अब तो पैसा भी…’, Blue Tick हटवल्यानंतर अमिताभ बच्चन यांचे ट्वीट व्हायरल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -