अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्यांना दिलं सडेतोड उत्तर, म्हणाले….”मी पित नाही, दुसऱ्यांना पाजतो.”

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात, फेसबुक, ट्विटर , इंस्टाग्राम यांवर ते अनेक पोस्ट शेअर करत असतात. मात्र अनेकदा असं होतं की, अमिताभ यांनी लिहिलेलं अनेकांना उमगत नाही आणि त्याचा अर्थ देखील स्पष्ट होत नाही. आता असाच एक मुद्दा समोर आला आहे. ज्यानंतर सोशल मीडियावरील युजर्सनी त्यांना ट्रोल करायला सुरूवात केली आहे. त्या युजर्सना अमिताभ यांनी उत्तर देखील दिलं आहे.

खरंतर अमिताभ बच्चन यांनी १५ मे च्या दुपारी ११ वाजून ३६ मिनिटांनी फेसबुकवर लिहिलं की, ‘प्रातःकाळच्या शुभेच्छा!’ म्हणजेच शुभ सकाळ अशा शुभेच्छा दिल्या आहेत. इतक्या उशीरा हा मॅसेज केल्यामुळे सोशल मीडिया युजर्सने त्यांना धारेवर धरलं आहे. त्यातील एकजण म्हणाला, “तुम्हाला नाही वाटत का,तुम्ही खूप लवकर प्रातःकाळच्या शुभेच्छा दिल्या आहेत”. यावर अमिताभ यांनी उत्तर दिलं. “रात्री उशिरापर्यंत शूटिंगमध्ये व्यस्त होतो,त्यामुळे सकाळी जाग उशिरा आली. युजर्स पैकी अजून एकजण म्हणाला, “अरे म्हाताऱ्या दुपार झाली”, यावर सडेतोड उत्तर देत अमिताभ म्हणाले की, “तुम्ही चिरायु असावं, अशी माझी प्रार्थना आहे आणि देवकरो तेव्हा तुम्हाला कोणीही म्हातारा म्हणू नये.”

अमिताभ बच्चन यांनी केली नेटकऱ्यांची बोलती बंद


अमिताभ यांच्या लेट पोस्टवर अनेकजण कमेंटचा वर्षाव करत असताना एकजण म्हणाला, आज खूप उशीरा उतरली वाटतं…आजकाल ११ :३० वाजता सकाळ होते. यावर अमिताभ उत्तर देत म्हणाले, मी पित नाही, दुसऱ्यांना पाजतो. अमिताभ यांनी अनेक युजर्सना सडेतोड उत्तर दिले आहे.

 

 


हेही वाचा :निखिल चव्हाणने यंदा “छत्रपती संभाजी महाराज गौरव पुरस्कार” सोहळ्यात रोवला मानाचा तुरा