आता अमिताभ यांनी ट्वीटरवरुन एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. ‘झुंड’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले असून, त्याविषयी केलेल्या पोस्टमध्ये बिग बींनी लिहीले आहे, की ‘एखादी सुरु केलेली गोष्ट जेव्हा सोडण्याची/ संपवण्याची वेळ येते तेव्हा त्याविषयीच्या भावना या वेगळ्याच असतात’. या पोस्टमध्ये बिग बींनी झुडं टीमच्या संपूर्ण टीमचे आभारही मानले आहेत. झुंड चित्रपटाच्या टीमने अमिताभा बच्चन यांना उचलून धरल्याचं आपल्याला या फोटोमध्ये दिसत आहे.
T 3054 – As you end one and get set to leave .. the emotions and withdrawal symptoms begin to reflect .. thank you JHUND .. hello again BRAHMASTRA .. pic.twitter.com/ZsID7jUs8y
— Amitabh Bachchan (@SrBachchan) January 11, 2019
दरम्यान, झुंडच्या शूटिंगमधून फ्री झाल्यानंतर पुन्हा एकदा ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटाचे शूटिंग सुरु करणार असल्याचं बिग बींनी या पोस्टद्वारे जाहीर केले आहे. करण जोहर प्रॉडक्शनच्या ‘ब्रम्हास्त्र’ या चित्रपटात अमिताभ बच्चन, आलिया भट्ट, रणबीर कपूर या तिघांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत. उपलब्ध माहितीनुसार, ब्रम्हास्त्र हा epic saga असून त्यामध्ये larger than life संकल्पना रेखाटण्यासाठी VFX चा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येणार आहे. २०१९ च्या ख्रिसमसपर्यंत हा चित्रपट प्रदर्शित होणर असल्याचं निर्माता करण जोहरने जाहीर केलं आहे. दरम्यान, ‘ब्रम्हास्त्र’च्या निमीत्ताने