घरताज्या घडामोडीअमिताभ बच्चन यांची नात नव्या डिप्रेशनची शिकार; व्हिडिओतून व्यक्त केल्या भावना!

अमिताभ बच्चन यांची नात नव्या डिप्रेशनची शिकार; व्हिडिओतून व्यक्त केल्या भावना!

Subscribe

महानायक अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदाने नुकतीच आरा हेल्थ ही संस्था सुरू केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून ती मानसिक आरोग्य आणि त्या संबंधी समस्यांबाबत जागरूकता निर्माण करण्याचं काम करते. याचदरम्यान तीने शेअर केलेल्या एका व्हिडिओने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. या व्हिडिओत तीने आपल्या मानसिक आवस्थेबद्दल आणि दिलेल्या लढ्याचा अनुभव शेअर केला आहे.

नव्या आरा हेल्थ संस्थेच्या इतर तीन सहसंस्थापकासह आपला अनुभव शेअर करताना दिसते आहे. तीला एन्झायटी होती आणि त्यातून बाहेर येण्यासाठी तिला थेरेपीची मदत घ्यावी लागली, याबद्दल सांगितले आहे.

- Advertisement -

काय म्हणाली नव्या व्हिडिओत

नव्या म्हणते, सुरूवातीला मी थेररेपी घेत असल्याचं सगळ्यांना सागणं माझ्यासाठी खूप कठीण होतं. माझ्या कुटुंबियांना फक्त माहित होतं की मी थेरपी घेते. पण माझ्या कोणत्याच मित्र- मैत्रीणींना याबाबत माहिती नव्हती. मी त्यांना आता सांगू शकेन नी नाही हे ही मला महिती नव्हतं. मी नुकताच एन्झायटीशी लढा दिला आहे. मला अनेक समस्या उद्भवत होत्या, खूप त्रास होत होता. अनेकदा मी अशा परिस्थितीत होते. मात्र माझ्यासह असं का होतं आहे हे मला समजत नव्हतं. त्यानंतर काही तरी बदलण्याची खरंच गरज आहे. आता मला याबद्दल बोलावचं लागेल. आता मी पुन्हा या अवस्थेत कधीच जाणार नाही. कारण आता सगळं माझ्या नियंत्रणात आहे. कारण मी याबबात सतत कोणाशीतरी बोलते आहे. अनेक लोकांना आपल्याला खरंच मदतीची गरज हे हे खूप उशिराने समजतं असं मला वाटतं.

- Advertisement -

नव्याने फोर्डम युनिव्हर्सिटीतून डिजीटल टेक्नॉलॉजीमध्ये ग्रॅज्युएशन केलं आहे. नुकतीच तिची ग्रॅज्युएशन सेरेमनी झाली. मात्र कोरोनाच्या परिस्थितीत ती युनिव्हर्सिटीला जाऊ शकली नाही, त्यामुळे मुंबईतील घरातच तिचा ही ग्रॅज्युएशन सेरेमनी पार पडली. त्यानंतर आता नव्याने आरा हेल्थ ही संस्था सुरू केली आहे.


हे ही वाचा – होर्डिंग लावताना तीघांचा मृत्यू, अभिनेत्याला वाढिवसाच्या शुभेच्छा देणं पडलं भारी!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -