‘कुछ है नहीं लिखने को’..असे लिहताच बिग बी झाले ट्रोल

सोशल मीडियाच्या प्रेमाच्या वर्षावासोबतच बिग बींना ट्रोलिंगचा शिकार देखील व्हावे लागले आहे.

amitabh bachchan is getting troll on social media
'कुछ है नहीं लिखने को'..असे लिहताच बिग बी झाले ट्रोल

बॉलिवूडचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा भला मोठा चाहतावर्ग आहे. गेली अनेक दशके अमिताभ बच्चन यांनी चित्रपट सृष्टीत आपले महत्वपुर्ण योगदान दिलं आहे. अशातच बिग बी आजच्या डिजिटल युगात सुद्धा प्रत्येक व्यत्तीशी जोडण्याकरीता तसेच आपल्या व्यक्तीगत,व्यवसायिक घडामोडी सोशल मीडियाचा आधारे चाहत्यांसोबत शेअर करत असतात. त्यांच्या प्रत्येक पोस्टवर लाखो कमेंट आणि लाइक्सचा वर्षाव होत असतो. अशातच सोशल मीडियाच्या प्रेमाच्या वर्षावासोबतच बिग बींना ट्रोलिंगचा शिकार देखील व्हावे लागले आहे. नुकतच अमिताभ बच्चन यांनी केलेल्या एका पोस्टवर नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे.
महानायक अमिताभ बच्चन यांनी अधिकृत ट्विटर अकांउटवर लिहलं आहे की, ‘कुछ लिखने को नहीं है’. या वाक्यावरुन नेटकऱ्यांनी अमिताभ बच्चन यांच्यावर टिकेची झोड उठवली आहे. एका युजर्सने त्यांना वाढत्या महागाई बद्दल लिहण्यास सांगितले तर एकाने पेट्रोल डिजेलच्या वाढत्या किंमतीवर लक्ष द्या असं लिहलं आहे. यामुळे अमिताभ बच्चन यांनी काही न लिहून सुद्धा ट्रोल व्हावे लागत आहे.(amitabh bachchan is getting troll on social media)


अमिताभ बच्चन यांनी काही दिवसापुर्वी केलेल्या एका पोस्टमध्ये मिर्जा गालिब आणि एकबाल यांची एक शायरी लिहली होती. तसेच एक फोटो शेअर करत त्याला कॅप्शन दिलं होतं की, ‘शायरी, बनाम शायरी!’ तसेच फोटोवर लिहलं होतं ‘दो मशहूर शायरों के अपने अपने अंदाज।’  यावर मिर्जा गालिब आणि एकबाल याचं नाव लिहलं होतं. अनेकांनी अमिताभ बच्चन यांची पोस्ट क्रॉसचेक केली यानंतर त्यांना पोस्टवर लिहण्यात आलेल्या मिर्जा आणि एकबाल यांचा काहीच संबध नसल्याचे आढळून आले. तसेच यानंतर बिग बीवर ट्रोलर्सनी निशाणा साधला होता.


हे हि वाचा – अभिनेत्री आलिया भट्टने स्विकारलं चाळीस दिवसांचं फिटनेस चॅलेंज