अमिताभ बच्चन यांची अतरंगी फॅशन पाहून ट्रोलर्सनी उडवली खिल्ली; रणवीर सिंहसोबत केली तुलना

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन वयाबरोबरच आपली तब्बेतीकडे सुद्धा व्यस्थित लक्ष देतात. जगभरात त्यांच्या अभिनाचे आणि स्टाईलचे आजही करोडो चाहते आहेत. नुकताच अमिताभ बच्चन एक अतरंगी फोटोशूट केलं आहे. जे पाहून अनेकजण आश्चर्यचकत झाले आहेत. अमिताभ यांचा विचित्र लूक पाहून युजर्स त्यांना ट्रोल करू लागले आहेत. तर काही युजर्सना अमिताभ यांचा हा लूकपाहून रणवीर सिंहची आठवण येत आहे.

अमिताभ बच्चन यांनी कोण बनेगा करोडपतीच्या सेटवर घातले विचित्र कपडे

अमिताभ बच्चन यांनी नुकतीच एक पोस्ट त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली आहे. खरंतर या फोटोमधील त्यांचा हा लूक त्यांनी त्यांच्या कोण बनेगा करोडपती या कार्यक्रमात परिधान केला होता. त्यावेळी तिथे उपस्थित प्रेक्षक आश्चर्यचकित झाले होते. कारण या त्यावेळी अमिताभ यांनी पांढऱ्या रंगाची हुडी सोबत हरेम पँन्ट परिधान केली होती, शिवाय गळ्यात स्कार्फ अडकवला होता आणि डोळ्यांवर चश्मा लावला होता. इतकंच नव्हे तर अमिताभ यांनी या विचित्र पोशाखासोबत पांढऱ्या रंगाचे बूट सुद्धा घातले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

हा फोटो शेअर करत अमिताभ बच्चन यांनी इंस्टाग्रामवर एक मजेशीर कॅप्शन सुद्धा दिलं आहे. त्यात त्यांनी लिहिलंय की, “पहन्ने को दे दिया पजामा, लगा साड़ी को फाड़ा, आगे छोटी जेब दे दी, औ’ पीछे लगा है नाड़ा !”

अमिताभ यांची अतरंगी स्टाईलपाहून लोकांना आली रणवीर सिंहची आठवण
अमिताभ बच्चन यांची अतरंगी फॅशन पाहून सोशल मीडियावर युजर्सने ट्रोल केले आहे. तर काहीजणांनी ही फॅशन रणवीर सिंहच्या फॅशनसारखी असल्याचं म्हटलं आहे. एकजणाने तर कमेंटमध्ये लिहिलं की, “सर रणवीर सिंह सोबत मैत्री केली का?” तर दुसऱ्याने लिहिलं, “असं वाटतंय रणवीर सिंह तुमच्या शरीरात घुसला आहे.” तर तिसऱ्या एकाने लिहिलं की, “सर असं वाटतंय हा पायजमा रणवीर सिंहने डिझाइन केला आहे.”


हेही वाचा :‘ब्रह्मास्त्र 2’मध्ये दीपिका पादुकोण मुख्य भूमिकेत