घरमनोरंजनअमिताभ बच्चन यांनी चित्रपटात साकारली 'या' अभिनेत्यांच्या वडिलांची भूमिका

अमिताभ बच्चन यांनी चित्रपटात साकारली ‘या’ अभिनेत्यांच्या वडिलांची भूमिका

Subscribe

अमिताभ बच्चन हे अनेकदा वडिलांच्या भूमिकेत सुद्धा दिसले आहेत. अमिताभ बच्चन यांनी अनेक बॉलिवूड कलाकारांच्या वडिलांची भूमिका चित्रपटात साकारली आहे.

बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी आपल्या दमदार अभिनयामुळे चित्रपट सृष्टीत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. अमिताभ बच्चन यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमधून विविध भूमिका साकारल्या त्या अत्यंत हिट सुद्धा झाल्या. अमिताभ बच्चन यांनी अनेक चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या होत्या. पण अमिताभ बच्चन हे अनेकदा वडिलांच्या भूमिकेत सुद्धा दिसले आहेत. अमिताभ बच्चन यांनी अनेक बॉलिवूड कलाकारांच्या वडिलांची भूमिका चित्रपटात साकारली आहे. आज 11 ऑक्टोबर अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने अमिताभ बच्चन यांनी कोणत्या बॉलिवूड कलाकारांच्या वडिलांची भूमिका साकारली हे पाहू.

102 नॉट आउट

- Advertisement -

1) 2018 मध्ये आलेल्या 102 नॉट आऊट या चित्रपटात अमिताभ बच्चन वेगळ्या भूमिकेत दिसले होते. चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी 102 वर्षांच्या वडिलांची भूमिका साकारली होती. ज्यांच्या ऑन-स्क्रीन मुलाची भूमिका ऋषी कपूर यांनी साकारली होती. खूप मोठ्या काळानंतर अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर एकत्र पडद्यावर दिले होते. दरम्यान या दोघांची केमिस्ट्रीही प्रेक्षकांना खूप आवडली.

कभी खुशी कभी गम

- Advertisement -

2) 2001 साली प्रदर्शित झालेल्या कभी खुशी कभी गम या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी बिझनेसमनची भूमिका साकारली. या चित्रपटात अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेता हृतिक रोशन यांच्या वडिलांच्या भूमिकेत अमिताभ बच्चन दिसले होते.

बागवान

3) 2003 मध्ये प्रदर्शित झालेल्या बागवान या चित्रपटात अमिताभ बच्चन पुन्हा एकदा वडिलांच्या भूमिकेत दिसले. या चित्रपटातील त्यांची हेमा मालिनी यांच्या सोबत स्क्रीन शेअर केली होती. या चित्रपटात अमिताभ यांनी एका वडिलांची भूमिका साकारली आहे.

वक्त- द रेस अगेंस्ट टाइम

4) 2005 मध्ये आलेल्या ‘वक्त – द रेस अगेन्स्ट टाइम’ या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी पुन्हा एकदा वडिलांची भूमिका साकारली होती. या चित्रपटात अक्षय कुमारच्या वडिलांची भूमिका साकारली होती.

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -