Friday, April 16, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन बिग बींनी घेतली कोरोना लस

बिग बींनी घेतली कोरोना लस

Related Story

- Advertisement -

देशभरात कोरोना लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्याला १ एप्रिलपासून सुरुवात झाली. लसीकरणाच्या या टप्प्यात बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. याबाबतची माहिती बिग बींनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अमिताभ यांनी लिहिलं, की अखेर मी दुपारी कोरोना लस घेतली. सर्वकाही ठीक आहे, असे त्यांनी लिहिले आहे. अभिषेक बच्चन वगळता कुटुंबातील प्रत्येक सदस्स्यानं कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. (Amitabh Bachchan Received First Dose of Corona Vaccine)

- Advertisement -

गेल्या वर्षी बिग बींना कोरोनाचा संसर्ग झाला होता. यामुळे त्यांना मुंबईच्या नवनीत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय आणि आराध्यालाही कोरोनाची लागण झाली होती. मात्र उपचाराअंती बिग बींसह, अभिषेक, ऐश्वर्या आणि आराध्या सुखरूप बाहेर पडले. अमिताभ बच्चन यांच्यासह बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र, सतीश शाह, जॉनी लीवर, जितेंद्र, हेमा मालिनीसह सलमान खाननेही कोरोना लस घेतली आहे.

बिग बींच्या वर्कफ्रिंट बद्दल सांगायचे झाल्यास, नुकतेच अमिताभ बच्चन ‘गुलाबो सिताबो’ या चित्रपटात झळकले होते. दरम्यान बीग बिंग अनेक प्रोजेक्टवर सध्या काम करत आहेत. दरम्यान २०२२० मध्ये रिलीज झालेला बहुचर्चित ‘झुंड’ या सिनेमात बिग बी एका फूटबॉल कोचचा भूमिकेत पाहयला मिळाले. तर ‘चेहरे’ सिनेमातील बिग बींची वकीलाच्या पेशातील छबी ट्रेलरमधून प्रेक्षकांसमोर आली. परंतू कोरोना महामारीमुळे या सिनेमाचे प्रदर्शन थांबण्यात आले आहे. दरम्यान ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमातही बिग बी झळकणार आहे.


- Advertisement -

 

 

- Advertisement -