घरमनोरंजनदादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बिग-बींनी मानले आभार

दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बिग-बींनी मानले आभार

Subscribe

'कृतज्ञ हूं मैं , परिपूर्ण , आभार और धन्यवाद ... मैं केवल एक विनयपूर्ण , विनम्र अमिताभ बच्चन हूं।'

चित्रपटसृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन यांना मंगळवारी दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला. हा पुरस्कार चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा प्रतिष्ठेचा पुरस्कार मानला जातो. हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर हिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्वीट करत ही आनंदाची बातमी दिली. आपल्या दमदार अभिनयाने अमिताभ बच्चन यांनी चित्रपटसृष्टीवर राज्य केलं.

आपलं संपूर्ण आयुष्य त्यांनी चित्रपटांसाठी व्यतीत केलं आहे. त्यांच्या या कार्यासाठी त्यांची ‘दादा साहेब फाळके पुरस्कारा’ साठी एकमताने निवड करण्यात आली. यानंतर देशातील प्रत्येक कलाक्षेत्रातून अमिताभ बच्चन यांच्यावर आनंद आणि कौतुकाचा वर्षाव करण्यात आला. सगळ्यांनी केलेल्या कौतुकाचे बिग बींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आभार मानले आहेत.

- Advertisement -

‘कृतज्ञ हूं मैं , परिपूर्ण , आभार और धन्यवाद … मैं केवल एक विनयपूर्ण , विनम्र अमिताभ बच्चन हूं।’ असं म्हणत अमिताभ बच्चन यांनी ट्विटरच्या माध्यमातून कृतज्ञता व्यक्त केली आहे.

- Advertisement -

आत्तापर्यंत पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या पुरस्कारासह तीन वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. दरम्यान, अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर होताच विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करणारे ट्विटही केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -