घरताज्या घडामोडीबिग बींनी रूग्णालयातून केलं आणखी एक ट्विट, चाहत्यांना म्हणाले....!

बिग बींनी रूग्णालयातून केलं आणखी एक ट्विट, चाहत्यांना म्हणाले….!

Subscribe

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यामध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे आढळली आहेत. त्यामुळे आता बिग बींची प्रकृती स्थिर असून त्यांना आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले  आहे.  शनिवारी रात्री बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी ट्विट करत कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली. या बातमीने चाहत्यांमध्ये एकच खळबळ उडाली.

- Advertisement -

बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन कोरोना पॉझिटिव्ह असल्याने चाहते त्याच्यासाठी प्रार्थना करत आहेत. देशाच्या बर्‍याच भागात अमिताभच्या आरोग्यासाठी पूजा केली जात आहे. अनेक चाहते सोशल मीडियावर अमिताभ यांच्या प्रकृतीसाठी शुभेच्छा देत आहेत. अमिताभ सध्या मुलगा अभिषेक बच्चन यांच्यासह मुंबईच्या नानावटी रुग्णालयात दाखल आहेत. आपल्या ट्वीटद्वारे त्यांनी प्रार्थना केलेल्या सर्वांचे आभार मानले आहेत. अमिताभ यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की अभिषेक, ऐश्वर्या आराध्या आणि माझ्यासाठी ज्यांनी प्रार्थना केली त्या सर्वांचे मनापासून आभार.

- Advertisement -

त्याशिवाय अमिताभ यांनी दुसरे ट्विट केले आणि लिहिले की, “माझ्यासाठी,अभिषेक, ऐश्वर्या आणि आराध्यासाठी तुम्ही केलेल्या प्रार्थनेबद्दल मी सर्वांचे हात आभार व्यक्त करतो.

अमिताभ आणि अभिषेक यांच्यानंतर पत्नी ऐश्वर्या राय बच्चन आणि मुलगी आराध्याचे कोरोना चाचणीचे रिपोर्ट आले आहेत. दोघींचे कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत”. अभिषेक बच्चनने टि्वटरवरुन रविवारी संध्याकाळी ही माहिती दिली. ऐश्वर्या आणि आराध्या यांना रुग्णालयात दाखल करण्यात येणार नाही. “त्या घरीच होम क्वारंटाइनमध्ये राहणार आहेत. मुंबई महापालिकेने सध्याच्या स्थितीबद्दल माहिती दिली असून ते आवश्यक ती सर्व पावले उचलत आहेत” असे अभिषेक बच्चनने त्याच्या टि्वटमध्ये म्हटले आहे. माझी आई जया बच्चन आणि कुटुंबातील अन्य सदस्यांचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असल्याचेही अभिषेकने सांगितले.

नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार अमिताभ बच्चन यांच्या नजीकच्या संपर्कात असलेल्या स्टाफपैकी २६ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर २८ जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.


हे ही वाचा – बॉलिवूडमध्ये कोरोनाचा कहर; ३४ तासांत ११ सेलिब्रिटी पॉझिटिव्ह


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -