ऐश्वर्या – आराध्या कोरोनामुक्त; बिग बी झाले भावूक

बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन सध्या नानावटी हॉस्पिटलमध्ये कोरोनावर उपचार घेत आहेत. त्यांचा मुलगा अभिनेता अभिषेकदेखील कोरोनाबाधित असून तोदेखील नानावटीमध्ये दाखल आहे. दरम्यान, त्यांची सून ऐश्वर्या आणि नात आराध्या या दोघी काही दिवसांपूर्वी उपचाराखातर नानावटीमध्ये दाखल झाले होते. काल त्या दोघींची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याचे त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यानतंर अमिताभ बच्चन यांनी एक भावूक ट्विट केले असून मला अश्रू अनावर झाल्याचे म्हटले आहे.

काय म्हणाले बिग बी 

आमची छोटी मुलगी आणि सूनबाई यांना हॉस्पिटलमधून मुक्ती मिळाली आहे. मला माझे आनंदाश्रू थांबवता आले नाही. देवा तुझी कृपा अपार आहे…

महानायक अमिताभ बच्चन, आणि अभिषेक बच्चन नंतर अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि तीची आठ वर्षाची मुलगी आरध्या या दोघींनाही नानावटी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र काल त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. अभिषेकने ट्विट करत आराध्या आणि ऐश्वर्याची टेस्ट निगेटीव्ह आल्याचे म्हटले सांगितले. त्याचबरोबर अभिषेकने चाहत्यांचे आभारही मानले. तुम्ही सातत्याने करत असलेल्या प्रार्थनांसाठी तुमचे खूप खूप आभार. मी तुमचा कायम ऋृणी आहे. ऐश्वर्या आणि आराध्या यांचा रिपोर्ट सुदैवाने निगेटिव्ह आला असून त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळत आहे. ते आता घरी राहतील. मी आणि बाबा अजूनही हॉस्पिटलमध्येच राहणार आहोत’, असे ट्विटमध्ये अभिषेकने म्हटले आहे.

हेही वाचा –

US Elections 2020: ट्रम्प आणि बिडेनमध्ये २९ सप्टेंबरला होणार पहिली डिबेट