Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Holi 2021 : बिग बींचे ४० वर्षानंतरही 'रंग बरसे भीगे चुनरवाली रंग...

Holi 2021 : बिग बींचे ४० वर्षानंतरही ‘रंग बरसे भीगे चुनरवाली रंग बरसे’

बॉलीवूडचे शेहनशहा यांनी फोटो शेअर करत दिल्या चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा.

Related Story

- Advertisement -

बॉलीवूडचे शेहनशहा, महानायक, बिग- बी अमिताभ बच्चन यांनी नुकताच इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत त्यांनी आपल्या चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी आपल्या कुटुंबाचा ब्लॅक And व्हाईट फोटो शेअर करत ४० वर्षानंतरही पुन्हा एकदा ‘रंग बरसे भीगे चुनरवाली रंग बरसे’, या गाण्याचे फोटोला कॅप्शन दिले आहे.

काय आहे फोटोत?

अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये त्यांची पत्नी जया बच्चन आणि मुलगा अभिषेक बच्चन दिसून येत आहे. तसेच हा फोटो रंगपंचमी खेळलेला असून अमिताभ बच्चन यांच्या खांद्यावर अभिषेक बच्चन यांना बसवले आहे. विशेष म्हणजे त्यांनी या फोटोला १९८१ साली प्रसिद्ध झालेल्या सिलसिला या चित्रपटातील गाण्याचे कॅप्शन दिले आहे. त्यांच्या या फोटोला अनेकांनी कमेंट्स दिल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

- Advertisement -

अमिताभ यांच्या या फोटोवर चाहत्यांनीही अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘१९८१च्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. हे गाणे पूर्वी जितके लोकप्रिय होते तितकेच आजही लोकप्रिय आहे’, अशी एकाने प्रतिक्रिया दिली आहे. तर दुसर्‍या युजर्सने ‘परफेक्ट फॅमिली’. तर एका चाहत्यांनी अमिताभ यांचे कौतुक करत लिहिले आहे की, ‘आजही तुमच्या आवाजात जादू आहे. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला होळीच्या हार्दिक शुभेच्छा’.


हेही वाचा – श्रेष्ठी देतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल – चंद्रकांत पाटील


- Advertisement -

 

- Advertisement -