Wednesday, July 28, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मनोरंजन 'होय, मी काम करतोय'; KBC च्या सेटवरील बिग बींचा जोश

‘होय, मी काम करतोय’; KBC च्या सेटवरील बिग बींचा जोश

Related Story

- Advertisement -

बॉलीवूडचे ज्येष्ठ कलाकार आणि सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी पुन्हा जोमाने काम करण्यास सुरूवात केली आहे. त्यांनी नुकतेच त्यांच्या फेसबुक पेजवर केबीसीच्या सेटवरील काही फोटो शेअर करत पोस्ट दिली आहे. या पोस्टच्या माध्यमातून मी काम करत असून या केबीसीची सवय झाली असल्याचे म्हटले आहे. बिग बी यांनी सोबत एक कविता शेअर केली आहे. कोरोनाच्या संकटकाळात अमिताभ बच्चन यांच्यासह मुलगा, सून आणि नातं यांनाही संसर्ग झाला होता. मात्र त्या सर्वांनी कोरोनावर विषय मिळवला. गेल्या काही दिवसांपासून देशात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली असून त्यानुसार सर्व क्षेत्रातील कामांना हळूहळू सुरू करण्यात येत आहेत. तसेच सरकार व कोर्टानेही ज्येष्ठ कलाकारांनी काम करण्यावरील निर्बंध हटवले आहेत. त्यामुळे अमिताभ बच्चन पुन्हा त्याच जोशाने आणि उत्साहाने सेटवर परतले असून तेथील काही फोटो त्यांनी चाहत्यांसाठी शेअर केले आहेत.

FB 2690 -जी हाँ हुज़ूर मैं काम करता हूँ,मैं तरह तरह के काम करता हूँ , मैं क़िस्म क़िस्म के काम करता हूँ कुछ काम…

Posted by Amitabh Bachchan on Tuesday, September 15, 2020

काय म्हटले आहे बिग बी यांनी 

- Advertisement -

जी हाँ हुज़ूर मैं काम करता हूँ,
मैं तरह तरह के काम करता हूँ ,
मैं क़िस्म क़िस्म के काम करता हूँ

कुछ काम किए थे मैंने मस्ती में
कुछ किए प्रात- रात ज़बरदस्ती में

- Advertisement -

ये kbc की लत लगी है, लोगों को
संतुष्ट करूँ बस यही अपेक्षा Sony को

शुरुआत हुई है, अभी तो दिन कुछ बाक़ी हैं
स्नेह आदर प्यार मिले, तो हम आभारी हैं

केबीसीच्या १२ व्या सिजनच्या चित्रीकरणाला काही दिवसांपूर्वीच सुरूवात झाली असून या शोची सवय झाली असल्याचे अमिताभ बच्चन यांनी म्हटले आहे. या नव्या सिजनमधूनही प्रेक्षकांना समाधानी करू शकेन, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच चाहत्यांकडून प्रेम, मान-सन्मान मिळत राहिला तर आभारी असेन असेही त्यांनी नमूद केले आहे.

हेही वाचा –

राज्यात येणारे चार दिवस पावसाचे

- Advertisement -