घरमनोरंजनबिग बींच्या फ्रेंच दाढी ठेवण्यामागे 'हे' आहे कारण

बिग बींच्या फ्रेंच दाढी ठेवण्यामागे ‘हे’ आहे कारण

Subscribe

‘रंग दे बसंती’, ‘भाग मिल्खा भाग’ अशा सुपरहिट चित्रपटाचे दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा सध्या सर्वाधिक चर्चेत आहेत. २७ जुलै रोजी ओमप्रकाश यांचे ‘द स्ट्रेंजर इन द मिरर’ ही पहिले पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकात अनेक कथा लेखक, चित्रपट दिग्दर्शकांसह राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्यासह काम करणाऱ्यांनी आपले अनुभव शेअर केले आहेत. दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश यांनी अमिताभ बच्चन यांच्या प्रसिद्ध ‘अक्स’ चित्रपटासाठी काम केलं आहे. या पुस्तकात अमिताभ बच्चन यांनी राकेश यांच्याबद्दल एक कधीही न सांगितलेला किस्से शेअर केले. तर फ्रेंच दाढी ठेवण्यामागचे कारणही बिग बींनी यावेळी सांगितले. यासाठी राकेश मेहरा यांनी इंस्टाग्रामवर एक रील शेअर केली आहे. ज्य़ात त्यांच्या पुस्तकातील अमिताभ बच्चन यांचा फोटो असून बीग बिंनीं लिहिलेला किस्सा आहे.

बिग बींच्या फ्रेंच दाढी ठेवण्यामागे हे आहे कारण


यात पुस्तकात बिग बींनी फ्रेंच दाढी ठेवण्याचे कारण शेअर केले आहे. राकेश मेहरा यांनी शेअर केलेल्या रिलमध्ये बिग बी सांगतात, अक्स चित्रपटात राकेश मेहराने त्यांना फ्रेंच दाढी ठेवण्यास सांगितले होते. तेव्हापासूनच बिग बी फ्रेंच दाढी ठेवतात. बिग बींचा कोणताही पेहराव असला तरी त्यांचा फ्रेंच दाढीवरील लूक कधी चेंज होत नाही. या रील व्हिडिओच्या बॅकग्राउंडला ‘बंदा ये बिंदास है’ गाणे ऐकायला मिळतेय हे अक्स चित्रपटातील आहे. ही पोस्ट शेअर करत राकेश यांनी एक कॅप्शन लिहिली की, एक डेब्यू करणारा दिग्दर्शक स्क्रीनवर याहून जास्त लेजेंड्री सुरुवात करु शकतो का? धन्यवाद अमिताभ बच्चन.

- Advertisement -

या सेलिब्रिटींनाही शेअर केले किस्से

राकेश कुमार यांच्या पुस्तकाचे अनावर अभिनेत्री सोनम कपूरच्या हस्ते झाले. रीता गुप्ता या पुस्तकाच्या सहाय्यक लेखिका आहेत. हे पुस्तक भारतात सर्वत्र खरेदीसाठी उपलब्ध आहे. या पुस्तकात भारतीय सिनेमा आणि जगभरातील जाहीरात क्षेत्रातील प्रसिद्ध नावं जसे कीस वहीदा रहमान, ए आर रहमान, मनोज वाजपेयी, अभिषेक बच्चन, फरहान अख्तर, सोनम कपूर, रवीना टंडन, रोनी स्क्रूवाला, अतुल कुलकर्णी, आर.माधवन, दिव्या दत्त आणि प्रल्हाद कक्कड यांची नावे सामील आहेत. या प्रत्येकाने काही ना काही किस्से शेअर केले आहेत.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -