Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन लवकरच रॅम्पवर परत येण्याची इच्छा... अपघातानंतर अमिताभ बच्चन यांची पोस्ट चर्चेत

लवकरच रॅम्पवर परत येण्याची इच्छा… अपघातानंतर अमिताभ बच्चन यांची पोस्ट चर्चेत

Subscribe

महानायक अमिताभ बच्चन यांनी दशकांपासून बॉलिवूड चित्रपटसृष्टीचा काळ गाजवला. आजही ते चित्रपटसृष्टीत तितकेच सक्रिय आहेत. 80 वर्षीय अमिताभ अभिनयापासून ते निवेदनापर्यंत अनेक क्षेत्रात कार्यरत आहेत. दरम्यान, नुकत्याच काही दिवसांपूर्वी एका शूटिंगदरम्यान, अमिताभ यांचा अपघात झाला होता. मात्र, आता यातून ते पूर्ण बरे झाले असून याबाबत त्यांनी सोशल मीडियावर अपडेट दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

अमिताभ सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. ते त्यांच्या प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्याबाबत देखील नवनवीन अपडेट चाहत्यांना शेअर करत असतात. नुकतीच त्यांनी सोशल मीडियावरुन त्यांची हेल्थ अपडेट चाहत्यांना दिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी त्यांचा जुना एक रँप वॉकदरम्यानचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यात त्यांनी काळ्या रंगाचा कुर्ता-पायजमा परिधान केला आहे. या फोटोसोबत खाली कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलंय की, “तुमच्या प्रार्थनेसाठी आणि मला बरं होण्यासाठी शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद. लवकरच रॅम्पवर परत येण्याची इच्छा आहे.” असं अमिताभ यांनी लिहिलं आहे.

‘प्रोजेक्ट के’दरम्यान झाला होता अपघात

- Advertisement -

नुकत्याच काही दिवसांपूर्वी अमिताभ यांचा हैदराबादमध्ये ‘प्रोजेक्ट के’च्या शूटिंगदरम्यान अपघात झाला होता. त्यावेळी त्यांच्या बरगडीला दुखापत झाली होती.हा चित्रपट नाग अश्विन दिग्दर्शित हा अॅक्शनपट असून चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्याशिवाय प्रभास, दीपिका पदुकोण आणि दिशा पटनी मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाची रिलीज डेट 12 जानेवारी 2024 आहे.

 


हेही वाचा :

कंगना रनौत लवकरच सुरू करणार स्वतःचे रेस्टॉरंट

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -