घरमनोरंजनSher Shivraj: दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर - अमोल कोल्हे यांच्यात वाद, लांजेकरांनी मागितली...

Sher Shivraj: दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर – अमोल कोल्हे यांच्यात वाद, लांजेकरांनी मागितली माफी

Subscribe

‘शेर शिवराज’ हा सिनेमा सगळीकडे गाजतोय. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी ‘शिवराज अष्टक’ या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर अधारीत आठ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येणार आहेत, त्यापैकी ‘शेर शिवराज’ हा सिनेमा चौथा आहे. मात्र सिनेमाला प्राईम टाईममध्ये स्थान न मिळाल्याने दिग्दर्शकासह संपूर्ण स्टारकास्टने नाराजी व्यक्त केली. हे संपूर्ण प्रकरण सुरू असताना आता प्रसिद्ध अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी एक व्हिडीओ शेअर करत दिग्पाल लांजेकर यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. याचा एक  व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

डॉ. अमोल कोल्हे यांनी व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, आजवर प्रत्येकवेळी छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारताना मी कायमच त्या थोर व्यक्तिरेखांना नतमस्तक होत प्रामाणिक प्रयत्न केला आहे. तसेच प्रत्येकाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मान ठेवून इतरांच्या सादरीकरणावर कधीही भाष्य केले नाही उलट कौतुकच केले.. असे असताना ‘अशा’ प्रकारची पोस्ट लिहिणाऱ्यांचे व ती शेअर करणाऱ्यांचे मनःपूर्वक आभार! दरम्यान व्हिडीओमध्ये त्यांनी दिग्दर्शक दिग्पाल लांजेकऱ्यांच नाव न घेता. त्यांच्यावर टीका केली आहे.

- Advertisement -

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Dr. Amol Kolhe (@amolrkolhe)

- Advertisement -

दोन तीन दिवसांपूर्वी एका दिग्दर्शकाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. त्या पोस्टअंतर्गत त्यांचा हेतू सिनेमाचं प्रमोशन करणं हा असले पण माझा त्या कलाकृतीशी कोणत्याही प्रकारचा संबध नसताना अप्रत्यक्षरित्या त्या पोस्टमध्ये माझा उल्लेख करण्यात आला आहे. हा उल्लेख अगदी आक्षेपार्ह पद्धतीने केला गेलाय म्हणून मला याबद्दल पोस्ट करण गरजेचं वाटतंय. यासह अनेकदा अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करायला हवं पण वारंवार अशा घटना घडतात तेव्हा खोटे आरोपही खरे वाटू लागतात.

दिग्पाल लांजेकर यांनी शेअर केलेली पोस्ट

दिग्पाला लांजेकर यांनी शेर शिवराज सिनेमा रिलीज झाल्यावर सिनेमाचं त्यांच कौतुक करणाऱ्या अनेक पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर शेअर केल्या होत्या मात्र एका पोस्टमध्ये टीव्हीच्या पडद्यावर शिवराय आणि शंभूराजे म्हणजे मीच अशी कोल्हेकुई बंद करुन शेर शिवराज हे असे असतात, हे सिद्द करणार सिनेमा चिन्मय मांडेलकरांचा जबरदस्त अभिनय असलेला सिनेमा अशा पद्धतीने अमोल कोल्हे यांच्या विरोधात आक्षेपार्ह शब्दात भाष्य केलं होतं. यावर आमोल कोल्हे यांनी विरोध केला. संपूर्ण घटना व्हायरल होताच दिग्पाल लांजेकर यांनी त्यांच्या अधिकृत फेसबूक अकांऊटवरुन व्हिडिओ शेअर करत अमोल कोल्हे यांची माफी मागितली आहे.

दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा व्हिडिओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Digpal Lanjekar (@digpalofficial)


 

हे ही वाचा – Ram Setu सिनेमाच्या पोस्टरमुळे Akshay Kumar ट्रोल; मशालीमागचे लॉजिक काय? चाहत्यांचा सवाल

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -