अमृता फडणवीस यांचं ‘अज मैं मूड बणा लेया’ गाणं प्रदर्शित; अल्पावधीत गाण्याला लाखो व्ह्यूज

राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या सातत्याने चर्चेत असतात. यात आता त्या एक गायिका म्हणून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करत आहेत. त्यांची अनेक गाणी आणि अल्बम प्रदर्शित झाले आहेत. ज्याची मोठी चर्चा देखील रंगल्या आहेत. सोशल मीडियावरही त्यांच्या गाण्यांवर चांगल्या -वाईट अशा दोन्ही प्रकारच्या कमेंट्स येत असतात. अशात अमृता फडणवीस यांचं आणखी एक नवं गाणं नुकतंच रिलीज झालं आहे.

अमृता फडणवीस यांचं ‘अज मैं मूड बणा लेया ए’ गाणं प्रदर्शित

गुरुवारी अमृता फडणवीस यांनी या गाण्याचा टीझर सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केला होता. दरम्यान, आता नुकत्याच काही वेळांपूर्वी हे गाणं प्रदर्शित झालं आहे. या गाण्यामध्ये अमृता फडणवीस गाणं गाण्यासोबतच नृत्य देखील करत आहेत. शिवाय त्यांचे गाण्यात विविध पोषाखातील हटके लूक देखील दिसत आहेत. काही तासांतच या गाण्याला दोन लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाल्या आहेत.

नेटकऱ्यांच्या सकारात्मक प्रतिक्रिया

अमृता फडणवीस यांच्या गाण्यांना काहीजण ट्रोल करत असतात. तर काहीजण चांगल्या प्रतिक्रिया देत असतात. अमृता फडणवीस यांच्या या गाण्याला नेटकरी चांगल्या प्रतिक्रिया देऊ लागले आहेत. तसेच त्यांच्या गाण्यातील लूकचे देखील कौतुक करत आहेत. आत्तापर्यंत अमृता फडणवीस यांनी ‘शिव तांडव स्तोत्र’, ‘तेरी मेरी फिर से’, ‘बेतिया’ यांसारखी गाणी गायली आहेत. शिवाय या गाण्यांना खूप लोकप्रियता देखील मिळाली होती.

 


हेही वाचा  :

सासू आणि पतीसोबत कतरिनाने घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन