कोणताही मंत्री असो त्यांच्या पत्नीला… अमृता फडणवीसांनी दिलं गमतीशीर उत्तर

या कार्यक्रमात अमृता फडणवीस ह्यांच्या बद्दल जाणून घेताना एक गोष्ट जाणवली कि त्या खूप आधुनिक विचारांच्या आहेत. कार्यक्रमातील महिला मंडळाने विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी मोकळेपणाने आणि खूप मज्जेदार उत्तर दिली.

मागील काही दिवसांपासून मराठी टेलिव्हिजनवर प्रसारित होणाऱ्या ‘बस बाई बस’ या नव्या आणि आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाची चर्चा सध्या संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे. विशेष म्हणजे महिला वर्गासाठी हा कार्यक्रम प्रामुख्याने सुरु करण्यात आला असून अभिनेते आणि दिग्दर्शक सुबोध भावे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत आहे. नुकताच या कार्यक्रमाचा तिसरा भाग प्रसारित झाला. कार्यक्रमाच्या तिसऱ्या भागात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी हजेरी लावली होती. यावेळी अमृता फडणवीसांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक गमतीशीर प्रसंग सांगितले. शिवाय त्यांना विचारलेल्या अतरंगी प्रश्नांची उत्तरंही त्यांनी दिली.

या कार्यक्रमात अमृता फडणवीस ह्यांच्या बद्दल जाणून घेताना एक गोष्ट जाणवली कि त्या खूप आधुनिक विचारांच्या आहेत. कार्यक्रमातील महिला मंडळाने विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी मोकळेपणाने आणि खूप मज्जेदार उत्तर दिली. यात महिला मंडळाने विचारलेल्या गळ्यातील मंगळसूत्रबद्दलच्या प्रश्नाचे उत्तर फारच खुमासदार पणे दिले.दरम्यान, त्यांना दोन मंत्र्यांच्या बायकांच एकत्र आल्यावर जमतं का? असा आणखी एक गमतीदार प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्या एकदम हटके उत्तर देत म्हणाल्या की, “कोणताही मंत्री असो त्यांच्या पत्नीला घराबाहेर पडायला तेवढा वेळचं मिळत नाही. त्या सतत घरात काही ना काही कामं करत असतात. परंतु दोन मंत्र्यांमध्ये अडचणी निर्माण होतात. पण दोन मंत्र्यांच्या बायकांचं एकमेकांशी जमतं.

 

View this post on Instagram

 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

अमृता फडणवीस सतत चर्चेत असतात. गेल्या काही वर्षांपासून त्या विविध कार्यक्रमात सहभागी होताना दिसत आहेत. नियमित त्यांची विविध गाणीही प्रदर्शित होत असतात. अशाच एका टेलिव्हिजनवरील कार्यक्रमात त्या उपस्थित राहिल्या होत्या. त्यात त्यांनी सामान्य स्त्रियांच्या विविध प्रश्नांवर अगदी दिलखुलास उत्तरे दिली.


हेही वाचा :‘आसामला नेणार का?’ अमृता फडणवीसांच्या या प्रश्नाने वेधले सर्वांचे लक्ष; भर कार्यक्रमात पिकला हशा