घरक्राइम1 कोटीची लाच देऊ केल्याप्रकरणी अमृता फडणवीसांकडून डिझायनरविरोधात एफआयआर

1 कोटीची लाच देऊ केल्याप्रकरणी अमृता फडणवीसांकडून डिझायनरविरोधात एफआयआर

Subscribe

मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी फॅशन डिझायनर अनिक्षा हिच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. या फॅशन डिझायनरने 1 कोटींच्या लाचेची ऑफर दिल्याचा आरोप अमृता फडणवीस यांनी केला आहे. अमृता फडणवीस यांच्या तक्रारीनंतर मलबार हिल पोलिसांनी त्या महिलेवर गुन्हा दाखल करत चौकशी सुरू केली आहे.

20 फेब्रुवारी 2023 रोजी नोंदविलेल्या एफआयआरमधील माहितीनुसार, ही महिला अमृता फडणवीस यांच्याशी मागील 16 महिन्यांपेक्षा अधिक काळ संपर्कात होती. तिने अमृता फडणवीसांची अनेकदा प्रत्यक्षात त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. शिवाय, पैसे कमावण्याचे एक माध्यम म्हणून तिने कथितरीत्या काही बुकींची माहितीही देऊ केली होती. तसेच एका प्रकरणातून आपल्या वडिलांची सुटका करण्याच्या दृष्टीने तिने तब्बल 1 कोटी रुपयांची ऑफरही तिने अमृता फडणवीस यांना दिली होती.

- Advertisement -

अमृता फडणवीसांनी या महिलेवर केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, 18 आणि 19 फेब्रुवारीला अनिक्षाने अज्ञात फोन नंबरवरून व्हिडीओ क्लिप, व्हॉइस नोट्स आणि अनेक मेसेज पाठवले. यातून ती आणि तिचे वडील आपल्याला अप्रत्यक्षपणे धमकावण्याचा प्रयत्न करत होते, असा आरोप अमृता फडणवीस यांनी केला आहे.

दरम्यान, या सर्व प्रकरणात आरोपी महिला अनिक्षा आणि तिचे वडील यांच्याविरोधात पोलिसांनी धमकावणे, कट रचणे आणि लाच ऑफर करणे या कलमा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम 120 (बी) (षड्यंत्र) आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, 1988च्या कलम 8 आणि 12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी कलम 8 भ्रष्ट आणि बेकायदेशीर मार्गाने प्रवृत्त करण्याशी संबंधित आहे.

- Advertisement -

हेही वाचा :

जनाची नाही तर मनाची…. तू मलायका नाहीस; उर्वशी ढोलकियाच्या ‘या’ फोटोंवर नेटकऱ्यांची प्रतिक्रिया

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -