आषाढी एकादशी निमित्त अमृता आशिषचा विठ्ठलचरणी नृत्याविष्कार

नृत्यदिग्दर्शक आशिष पाटील आणि अमृता खानविलकर यांनी जोडी सध्या सोशल मीडियावर हिट

Amrita Khanvilkar and Ashish patil new dance performance on occasion of Ashadi Ekadashi
आषाढी एकादशी निमित्त अमृता आशिषचा विठ्ठलचरणी नृत्याविष्कार

लावणी किंग आशिष पाटील त्याच्या जबरदस्त नृत्यकौशल्याने नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकत असतो. सध्या आशिष अभिनेत्री अमृता खानविलकर सोबत सोशल मीडियावर एकाहून एक धमाकेदार नृत्याविष्कार करताना दिसत आहे. आषाढी एकादशी निमित्त अभिनेत्री अमृता खानविलकर हिने नृत्यदिग्दर्शक आशिष पाटील यांच्यासह आपला नृत्याविष्कार विठ्ठलाच्या चरणकमली समर्पित केला. विठू माऊलीपर्यंत पोहोचण्याचा आणि त्याच्याशी एकरूप होण्याचा एकमेव मार्ग म्हणजे नादोपासना म्हणजेच नादाची उपासना. अमृता आणि आशिष यांनी आपण आपली कला आणि प्रतिभा ईश्वरचरणी समर्पित केली आहे.

नृत्यदिग्दर्शक आशिष पाटील आणि अमृता खानविलकर यांनी जोडी सध्या सोशल मीडियावर हिट ठरत आहे. दोघांच्या दुहेरी नृत्यांनी त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी ताल से ताल मीला या गाण्यावर सुंदर नृत्याविष्कार सादर केला होता तो प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला होता. त्यानंतर आता आषाढी एकादशीच्या निमित्ताने आशिष आणि अमृताच्या चाहत्यांना पुन्हा एकदा त्यांच्या नृत्याचा आनंद घेता येणार आहे.


हेही वाचा – Samantar 2: सईच्या एन्ट्रीनंतर ‘समांतर-२’ मध्ये नवे वळण, दुसरा सिझन ठरतोयं सुपरहिट