Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन मी तुम्हाला पुन्हा भेटेन… अमृता खानविलकरच्या पोस्टने खळबळ

मी तुम्हाला पुन्हा भेटेन… अमृता खानविलकरच्या पोस्टने खळबळ

Subscribe

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकरने आपल्या अभिनयाची छाप अनेक मराठी मालिका, चित्रपटांमध्ये उमटवली आहे. अभिनयासोबतच अमृताने आपल्या नृत्याचा देखील ठसा उमटवला आहे. सध्या अमृता तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत असते. अमृताने फक्त मराठीच नाही तर हिंदी मनोरंजन सृष्टीतही स्वतःची ओळख निर्माण केली आहे. अमृता सोशल मीडियावरही तितकीच सक्रिय असते. तिचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. दरम्यान, अशातच अमृताने काही काळ सोशल मीडियावरून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे.

अमृता खानविलकर घेणार सोशल मीडियावरुन ब्रेक

 

View this post on Instagram

 

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

अमृता सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. ती तिच्या सोशल मीडियावरुन प्रोफेशनल आणि पर्सनल अशा दोन्ही गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असते. मात्र, आता अशातच अमृताने तिच्या सोशल मीडियावरुन काही काळ ब्रेक घ्यायचा निर्णय घेतला आहे. नुकतीच तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने लिहिलंय की, “मी तुम्हाला पुन्हा भेटेन…जेव्हा योग्य वेळी आपले मार्ग कधीतरी पुन्हा एकमेकांसमोर येतील.” या पोस्ट सोबतच खाली कॅप्शन मध्ये तिने लिहिलंय की, “गुडबाय… मी ब्रेक घेत आहे. लवकरच पुन्हा एकदा भेटू.” तिची ही पोस्ट वाचून सर्वजण चकित झाले आहेत. या पोस्टवर तिचे अनेक चाहते तिला याबाबत प्रश्न विचारत आहेत.

- Advertisement -

दरम्यान, याबाबत कोणतेही कारण समोर आलेले नाही. कदाचित चित्रपटांच्या शुटिंगमध्ये व्यस्त असल्यामुळे अमृताने हा निर्णय घेतला असावा असं अनेकांचे मत आहे.


हेही वाचा :

श्रद्धा कपूरसोबत चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी आलियाने दिलेल्या नकाराला रणबीरचं उत्तर…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -