सैफ अली नाही तर अमृता सिंहला ‘या’ क्रिकेटरशी करायचं होत लग्न

दोन वेळा ब्रेक अप झाल्यानंतर अमृताने स्वत:ला त्यातून बाहेर काढले आणि नव्या जोडीदाराच्या शोधात असताना अमृताची सैफ अली खानसोबत ओळख झाली. १९९१मध्ये अमृता आणि सैफ यांनी लग्न केले.

८०च्या दशकात बॉलिवूडमध्ये एक वेगळे स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे अमृता सिंह (Amrita Singh)  अमृता त्यावेळची अशी एक अभिनेत्री होती जिची एक नजर हजारो प्रेक्षकांना खिळवून ठेवायची. अमृता सिंह आज तिचा ६४वा वाढदिवस साजरा करत आहे. जितक्या जलद गतीने अमृता तिच्या करियरमध्ये यशाच्या शिखरावर पोहोचली तितक्यात लवकर ती खाली देखील आली. बॉलिवूडमध्ये एकेकाळी टॉप अभिनेत्रींमध्ये असलेली अमृता सिंह अचानक गायब झाली. अनेक वर्ष अमृता सिंह बॉलिवूडपासून दूर आहे मात्र तिचा सिलसिला अजूनही कायम आहे.

वैयक्तिक आयुष्यामुळे राहिली चर्चेत

अमृता सिंह तिच्या अभिनयापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सर्वाधिक चर्चेत राहिली. अनेक हीट  चित्रपट तिने बॉलिवूडला दिले मात्र ती कायम तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेच सर्वांच्या लक्षात राहिली. अमृता तिच्या प्रोफेशनल लाइफमध्ये यशस्वी झाली मात्र वैयक्तिक आयुष्यात अमृताला अनेक गोष्टींचा सामना करावा लागला.

 

अमृता सिंहने तिच्यापेक्षा १२ वर्षांनी लहान असलेल्या सैफ अली खानसोबत लग्न केल्यानंतर बॉलिवूडकरांना दिवसा तारे दिसले होते. सैफ आणि अमृता सिंह यांची लव्ह स्टोरी सर्वश्रूत आहे. मात्र तुम्हाला माहिती आहे का सैफ अली खान नाही तर प्रसिद्ध क्रिकेटर रवि शास्त्रीशी अमृता सिंहला लग्न करायचे होते. मीडिया रिपोर्टनुसार, क्रिकेटर रवि शास्त्रीसोबत अमृताचे अफेअर होते. दोघांचा साखरपुडा देखील झाला होता. मात्र एका अटीने दोघांच्या नात्याला तडा गेला आणि त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

रवि शास्त्रींसोबत मॅगझीन कव्हरसाठी केलं होतं फोटोशूट

१९८०मध्ये अमृता आणि रवि शास्त्री यांच्या नात्याची जोरदार चर्चा सुरू होत्या. दोघांना अनेक वेळा एकत्र स्पॉट करण्यात आले होते. त्याचप्रमाणे अमृता सिंह अनेकवेळा रवि शास्त्री यांना चिअर अप करण्यासाठी स्टेडिअममध्ये देखील जायची. दरम्यान त्यांनी एका मॅगझीन कव्हरसाठी एकत्र फोटोशूट देखील केले होते. मात्र दोघांनी कधीही त्यांच्या नात्याचा उघडपणे खुलासा केला नव्हता.

मीडिया रिपोर्टनुसार, रवि शास्त्री यांनी अमृताला चित्रपटात काम न करण्याची अट घातली होती. त्यावेळेस अमृता बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री होती त्यामुळे तिला रवि शास्त्री यांची अट मान्य नव्हती. त्यामुळे दोघांनी नात्यातून वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

विनोद खन्नासोबतही अफेअर

रवि शास्त्रीनंतर अमृताचे नाव अभिनेते विनोद खन्ना याच्यासोबत जोडले गेले होते. दोघांचे अफेअर संपूर्ण बॉलिवूडला माहिती होते. मात्र विनोद खन्ना अमृतापेक्षा वयाने फार मोठे असल्याने अमृताच्या आईने दोघांच्या लग्नाला नकार दिला आणि अमृताला पुन्हा एकदा जोडीदाराला मुकावे लागले.

दोन वेळा ब्रेक अप झाल्यानंतर अमृताने स्वत:ला त्यातून बाहेर काढले आणि नव्या जोडीदाराच्या शोधात असताना अमृताची सैफ अली खानसोबत ओळख झाली. १९९१मध्ये अमृता आणि सैफ यांनी लग्न केले. दोघांना सारा अली खान आणि इब्राहिम अली खान अशी दोन मुले आहेत. कालांतराने दोघांच्या नात्यात खटके उडाले आणि २००४मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला.


हेही वाचा – Kareena Kapoor सोबत लग्न करण्याआधी Saif ने लिहीलं होतं Amrita Singhला पत्र!…