अमृता सुभाषने दिली गोड बातमी; चाहत्यांनी दिल्या शुभेच्छा

मराठमोळी अभिनेत्री अमृता सुभाषने आपल्या अभिनयाची छाप फक्त मराठी चित्रपटांमध्येच नाही तर बॉलिवूडमध्येही उमटवली आहे. अलीकडे अमृता वारंवार तिच्या चित्रपटांमुळे तसेच वेब सीरीजमुळे चर्चेत असते. दरम्यान, अमृता आता पुन्हा एकदा आणखी एका कारणामुळे चर्चेत आली आहे. नुकतीच एक पोस्ट अमृताने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने एक आनंदाची बातमी शेअर केली आहे.

अमृताने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन ती लवकरत आई होणार असल्याची माहिती दिली आहे. ही बातमी कळताच चाहत्यांसह अनेक सहकलाकार अमृताचं कौतुक करु लागले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amruta Subhash (@amrutasubhash)

अमृताने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर प्रेग्नंसी टेस्ट केलेला एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये प्रेग्नंसी टेस्ट पॉझिटिव्ह असलेली स्ट्रीप दिसत आहे. या फोटोखाली अमृताने कॅप्शन देखील दिलं आहे. ज्यामध्ये तिने लिहिलंय की,”एका आश्चर्याची सुरुवात झाली”, ही बातमी वाचून सर्वचजण खूश झाले. मात्र, खाली दिलेले पूर्ण कॅप्शन वाचल्यावर अनेकांचा हिरमोड झाला. कारण यामध्ये अमृताने लिहिलंय की, “मी नाही…तर वंडर वुमेनमधील जया प्रेग्नेंट आहे. तुम्ही मला ज्या शुभेच्छा दिल्या त्या जयाला सुद्धा द्या.”

खरंतर, वंडर वुमेन हा अमृताचा आगामी प्रोजेक्ट आहे. ज्यात ती जया ही भूमिका साकारणार आहे. या प्रोजेक्टचं प्रमोशन करण्यासाठी अमृताने ही पोस्ट शेअर केली आहे.


हेही वाचा :

लवकरच ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार ‘पोन्नियिन सेल्वन’