‘आसामला नेणार का?’ अमृता फडणवीसांच्या या प्रश्नाने वेधले सर्वांचे लक्ष; भर कार्यक्रमात पिकला हशा

सुबोध भावे आणि महिला मंडळ हे अमृता फडणवीसांचा जीवन प्रवास उलगडणार आणि त्यांना पेचात टाकणारे काही प्रश्न देखील विचारणार आहेत. या कार्यक्रमातील महिला मंडळाने त्यांना खूप गमतीशीर प्रश्न विचारले आणि त्यांनीही त्या प्रश्नांची तेवढीच खुमासदार अशी उत्तरे दिली आहेत.

काही दिवसांपूर्वी आलेला नवा कोरा कार्यक्रम ‘बस बाई बस’9bus bai bus) याची चर्चा सध्या संपूर्ण महाराष्ट्रात सुरु आहे. महिला वर्गासाठी हा कार्यक्रम प्रामुख्याने सुरु करण्यात आला आहे. अभिनेते आणि दिग्दर्शक सुबोध भावे9subodh bhave) या कार्यक्रमाचं उत्तम सूत्रसंचालन करत आहे. या कार्यक्रमाच्या तिसऱ्या भागात महिलांची ही राखीव बस एका सुप्रसिद्ध व्यक्ती साठी थांबवली आहे आणि ती व्यक्ती म्हणजे महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस. सुबोध भावे आणि महिला मंडळ हे अमृता फडणवीसांचा(amruta fadanvis) जीवन प्रवास उलगडणार आणि त्यांना पेचात टाकणारे काही प्रश्न देखील विचारणार आहेत. या कार्यक्रमातील महिला मंडळाने त्यांना खूप गमतीशीर प्रश्न विचारले आणि त्यांनीही त्या प्रश्नांची तेवढीच खुमासदार अशी उत्तरे दिली आहेत.

हे ही वाचा – मंगळसूत्र घातलं तर पतीने गळा पकडलाय असं वाटतं, अमृत फडणवीसांचं वक्तव्य

 

View this post on Instagram

 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

या कार्यक्रमात अमृता फडणवीस(amruta fadanvis) ह्यांच्या बद्दल जाणून घेताना एक गोष्ट जाणवली कि त्या खूप आधुनिक विचारांच्या आहेत. कार्यक्रमातील महिला मंडळाने विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी मोकळेपणाने आणि खूप मज्जेदार उत्तर दिली. यात महिला मंडळाने विचारलेल्या गळ्यातील मंगळसूत्रबद्दलच्या प्रश्नाचे उत्तर फारच खुमासदार पणे दिले. पुढच्या सहप्रवासी ह्या प्रसंगात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे राग व्यक्त करून “आसामला नेणार का ?” अशीही विचारणा केली असता उपस्थित सर्वजण खळखळून हसले. झी मराठी वरील ‘बस बाई बस’ या कार्यक्रमाचा हा भाग येत्या शुक्रवार आणि शनिवारी रात्री ९. ३० वाजता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

हे ही वाचा – मधुबाला यांच्या बायोपिकवर कुटुंबीयांचा आक्षेप, बहीण मधुर बृजभूषण म्हणाल्या…

कोणतंही वक्तव्य असो किंवा गाणं अमृता फडणवीस नेहमीच चर्चेच्या केंद्रास्थानी असतात. त्यांच्या ‘असंला नेणार का?” या वक्तव्याने सुद्धा सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अमृता फडणवीस सतत चर्चेत असतात. गेल्या काही वर्षांपासून त्या विविध कार्यक्रमात सहभागी होताना दिसत आहेत. नियमित त्यांची विविध गाणीही प्रदर्शित होत असतात. अशाच एका टेलिव्हिजनवरील कार्यक्रमात त्या उपस्थित राहिल्या होत्या. त्यात त्यांनी सामान्य स्त्रियांच्या विविध प्रश्नांवर अगदी दिलखुलास उत्तरे दिली.

हे ही वाचा – लेडीज स्पेशल बस, सुबोध भावेचा नवा कार्यक्रम लवकरच