Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा देणाऱ्या अमृता फडणवीस तुफान ट्रोल; नेटकरी म्हणाले....

पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा देणाऱ्या अमृता फडणवीस तुफान ट्रोल; नेटकरी म्हणाले….

Subscribe

आज ५ जून जागतिक पर्यावरण दिवस आहे. त्यानिमित्त अमृता फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. पर्यावरणदिना निमित्त अमृता फडणवीस यांनी निसर्गाच्या सानिध्यातील फोटो शेअर केले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सोशल मीडियावर खूप सक्रीय आहेत. त्या विविध प्रकारच्या कार्यक्रमांना हजेरी लावतात. तसेच त्या अनेक मुद्द्यांवर त्यांचं मतंही मांडत असतात. अलीकडेच त्यांनी पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा देत जंगलात फोटोशूट केलंय. या फोटोत त्यांनी वेस्टर्न असा ट्रॅक सूट घातला आहे.

- Advertisement -

अमृता फडणवीस यांनी चक्क या फोटोंना कॅपशन देत हे फोटो शेअर केले आहेत. अमृता फडणवीस यांना या फोटोंवरून प्रचंड ट्रोल केलं जात आहे. नेमकं म्हणायचं काय आहे हे कळायला अवघड आहे, असं नेटकरी म्हणत आहेत. तसेच अमृता फडणवीस फोटोला कॅप्शन देत म्हणता की, काही लोक मानवनिर्मित जगात हरवून जातात तर काही निसर्गाच्या जंगलात स्वतःला शोधण्यासाठी भटकतात, असं म्हणत अमृता यांनी फोटो शेअर केला आहे. पर्यावरणावर प्रेम करा, पर्यावरणाला मिठी मारा. स्वतःला शोधण्यासाठी आणि आपल्या जीवनाचा उद्देश शोधण्यासाठी निसर्गाचं संरक्षण करा. नेहमी निसर्गाच्या सानिध्यात जा, असं देखील फोटो शेअर करताना अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत. अमृता फडणवीस वेगवेगळ्या लुकमधले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यांचे फोटो सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतात.

- Advertisement -

अशातच अमृता फडणवीस यांच्या या फोटोंवर अनेक कंमेंट्स करत नेटकर्यांनी धुमाकूळ घातला आहे. तसेच अमृता फडणवीस कोणत्या ना कोणत्या गोष्टींमुळे ट्रॉल होत असतात. आणि नुकत्याच त्यांनी आज पर्यावर्णादिवशी अशा पोस्ट त्यांनी त्यांचा इंस्टाग्राम पेजवर पोस्ट करत शुभेच्छा दिल्या आहेत. यावर नेटकर्यांनी मनसोक्त तोंड सुख घेतला आहे. तसेच अमृता फडणवीस यांना पर्यावरणदिवसाचे महत्व देखील कंमेंट्स करत सांगितले आहे.


हेही वाचा : रणबीर कपूरचा ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाच्या सेटवरील व्हिडीओ व्हायरल

- Advertisment -