Saturday, March 2, 2024
घरमानिनीFashionAmruta Fadnavis : लाल बनारसी साडीत अमृता फडणवीस यांचा खास लूक

Amruta Fadnavis : लाल बनारसी साडीत अमृता फडणवीस यांचा खास लूक

Subscribe

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस कायम चर्चेत असते. गायिका अशी ओळख असलेल्या अमृता फडणवीस यांचा मोठा चाहता वर्ग आहे. त्या सोशल मीडियावर कायमच सक्रिय असल्याचे पाहायला मिळते.
अमृता फडणवीस यांची स्टाइल इतरांपेक्षा नेहमीच वेगळी असते. साडी असो किंवा वेस्टर्न असे कपडे नेहमीच क्लासी पद्धतीने परिधान करताना आपण त्यांना पाहतो. नवनवीन फोटो शूट करणं त्यांना खूप आवडते. कधी कधी अमृता फडणवीस यांना ट्रोलींगचा देखील सामना करावा लागतो.

नुकताच त्यांनी लाल बनारसी साडीमधील फोटो पोस्ट केला असून अनेकांनी त्यांच्या फोटोवर कमेंट्स केलेल्या दिसून येत आहेत.एखाद्या कार्यक्रमासाठी तुम्ही बनारसी साडी नेसण्याचा विचार करत असाल तर अमृता फडणवीस यांच्या या लाल सुंदर अशा बनारसी साडीवरून तुम्ही नक्कीच प्रेरणा घेऊ शकता.

- Advertisement -

बनारसी साडीची फॅशन कधीच जुनी होत नाही. बनारसी साड्यांचा इतिहास २००० वर्षांचा आहे. यामध्ये तुम्हाला वेल, पाने, आमरू, आंबी, डोमक इत्यादींचे पटर्न दिसतात. रॉयल लुक हवा असल्यास बनारसी साडी हा उत्तम पर्याय आहे.

गोल्डन बॉर्डर बनारसी, फूल स्लीव्ह्ज ब्लाऊज स्टाइल
अमृता फडणवीस यांनी नेसलेली ही बनारसी साडीला संपूर्ण गोल्डन फ्लोरल प्रिंट असून गोल्डन बॉर्डर करण्यात आली आहे. अत्यंत पातळ प्लीट्स काढून अमृता फडणवीस यांनी या साडीला आकर्षक लुक दिला आहे. त्यावर साधा सिंपल स्टाईलचा ब्लाऊज परिधान केला आहे. साडीला मॅचिंग असणाऱ्या ब्लाऊजवर साडीच्या बॉर्डरप्रमाणेच बॉर्डर आहे. ज्यामुळे परफेक्ट मॅच होत असून दिसायलाही खूप सुंदर आहे.

- Advertisement -

सिंपल हेअर स्टाइल
यांनी केसांना अत्यंत साधा सरळ लुक दिला असून मधून भांग पाडत दोन्ही बाजूंना केस कर्ल करण्यात आले आहेत. तुम्हालाही साडीसह कोणती हेअरस्टाईल करायची हा विचार असेल तर वेव्ही कर्ल लुक पर्याय असून शकतो अथवा आंबाडा आणि त्यात गजरेही माळून लुक करता येऊ शकतो.

कुंदन ज्वेलरी आणि मेकअप
या बनारसी साडीचा लुक अधिक रॉयल दिसावा यासाठी कुंदनचा हार, लहानसे कानातले आणि हातात लाल बांगड्यांसह कुंदनची बांगडी असा लुक केला आहे.  बनारसी साड्यांसह अशी कुंदन ज्वेलरी अधिक आकर्षक दिसते. या साडीसह त्यांनी यावर ग्लॉसी मेकअप केला आहे. काजळ, आयलायनर, आयलॅशेस आणि साडीला शोभेल असे आयशॅडो आणि ग्लॉसी डार्क लिपस्टिक असा मेकअप लुक करत त्यांंनी लक्ष वेधून घेतले.

- Advertisment -

Manini