मराठीसह हिंदी कलाविश्वात आपला ठसा उमटवणारी लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकरने नुकतंच मुंबईत नवीन घर घेतलं आहे. अमृता कायम सोशल मीडिया वरून तिच्या कामाबद्दल आणि वैयक्तिक आयुष्यातले खास क्षण चाहत्यांसोबत शेयर करताना दिसते आणि अशातच तिने सोशल मीडियावर नवीन वर्षात तिच्या नवीन घरी गृहप्रवेश केल्याचा खास व्हिडिओ पोस्ट केला आहे. सोशल मीडिया वर व्हिडिओ पोस्ट करत लिहिलं “नव्या वर्षाची नवी सुरुवात गृहप्रवेश केला आणि नव्या घराचा उंबरठा ओलांडला. स्वतःच्या हिमतीवर उभारलेल हे ” एकम”
काही दिवसांपूर्वी अमृताने सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओद्वारे अमृताने तिच्या नव्या घराची झलक दाखवली होती. मुंबईत स्वत:चं घर घेण्याचं तिचं स्वप्न अखेर पूर्ण झालं. अमृताने तिच्या या घराला एक गोड नावदेखील दिलंय. टोलेजंग इमारतीच्या 22 व्या मजल्यावर अमृताचं हे घर आहे.
View this post on Instagram
तिने आजवर अनेक वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आज प्रदर्शित झालेल्या संगीत मानापमान चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका देखील तिने साकारली आहे. 2025 वर्षाची उत्तम सुरुवात तिने केली असून वर्षभरात ती अनेक कलाकृती मधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे.
अमृता कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अमृता स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.