Saturday, March 15, 2025
27 C
Mumbai
HomeमनोरंजनAmruta Khanvilkar : अमृता झाली चिऊताई, आयटम सॉंगमध्ये गश्मीरसोबत झळकली चंद्रा

Amruta Khanvilkar : अमृता झाली चिऊताई, आयटम सॉंगमध्ये गश्मीरसोबत झळकली चंद्रा

Subscribe

कायम चर्चेत असलेली मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर पुन्हा एक खास सरप्राईझ घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं कळतंय. अमृताने तिच्या मित्र मंडळींच्या चित्रपटात एक खास आयटम सॉंग केलं आहे. ‘चिऊताई चिऊताई दार उघड’ असं या गाण्याचं नाव आहे. अमृताने तिच्या अभिनय प्रवासात पहिल्यांदाच हे आयटम सॉंग केले आहे. त्यामुळे तिचे चाहते देखील या गाण्याबाबत प्रचंड उत्सुक आहेत. अशातच हे गाणं रिलीज झालं असून सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसतंय. (Amruta Khanvilkar first item song released)

 

View this post on Instagram

 

A post shared by Panorama Music (@panoramamusic)


अमृताने कायम उत्तम भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. तिच्या अदाकारी आणि नृत्याविषयी बोलू तेव्हढं कमीचं. सुपरहिट लावण्या सादर केल्यानंतर आता अमृता या चित्रपटात पहिल्यांदा आयटम साँग करणार असून तिच्या नृत्याची पुन्हा एकदा जादू प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. सुशीला – सुजीतमधलं हे आयटम साँग नक्कीच काहीतरी कमाल आहे आणि नेहमीपेक्षा वेगळ्या रूपात अमृता या गाण्यात दिसतेय. तिचा नवा लूक आणि नव नाव यातून प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

आजवर अमृताने अनेक सुपरहिट लावण्या सादर केल्या आणि त्यातून प्रेक्षकांना मोहित केलं. यानंतर आता अमृता नव्या आयटम साँगमधून पुन्हा एकदा प्रेक्षकांची मन जिंकणार यात शंका नाही. अमृता या गाण्यात तिच्या आवडत्या मित्रासोबत म्हणजे गश्मीर महाजनीसोबत स्क्रीन स्पेस शेयर करते आहे. सुशीला- सुजीतमध्ये ‘चिऊताई चिऊताई दार उघड’ हे गाणं नक्कीच धम्माल करून जाणार आहे असं दिसतंय. वैविध्यपूर्ण भूमिका असो किंवा कोणताही नृत्यप्रकार अमृता कायम तिच्या भूमिकांनी प्रेक्षकांना मोहित करत आली आहे आणि आता पुन्हा एकदा या पहिल्या वहिल्या आयटम साँगमधून अमृता प्रेक्षकांना खिळवून ठेवणार यात शंका नाही.

हेही पहा –

Punha Ekda Sade Made Teen : ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’चे शूटिंग पूर्ण