फॅशन असो वा अभिनय नेहमीच चर्चेत असलेली अभिनेत्री अमृता खानविलकर. ती कायम आपल्या कामातून प्रेक्षकांना आनंद देत असते. आता पुन्हा एकदा नव्या वर्षात अमृता आपल्या चाहत्यांसाठी एक खास सरप्राईज घेऊन आली आहे. व्हेलेंटाईन डेचे औचित्य साधून तिने हे खास सरप्राईज गिफ्ट संपूर्ण प्रेक्षकवर्गाला दिलं. 2025 या वर्षात अमृता अनेक बॉलिवूड तसेच मराठी चित्रपटाचा भाग होण्याची चर्चा सुरू असताना आता बहुचर्चित ‘सुशीला- सुजीत’मध्ये ती झळकणार का? असा प्रश्न सगळ्यांना पडलाय. (Amruta Khanvilkar playing important role in movie Susheela Sujeet)
‘सुशीला- सुजीत’मध्ये अमृता?
अशातच अभिनेत्री अमृता खानविलकरने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने ‘सुशीला- सुजीत’मधील तिच्या भूमिकेचे पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये अमृता दिसतेय खरी. पण ती कोणती भूमिका साकारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
View this post on Instagram
तीच्या या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यात या पोस्टच्या कॅप्शनने प्रेक्षकांना आणखीच कोड्यात पाडले आहे. अमृताने शेअर केलेल्या पोस्टसोबत कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘स्वप्नील आहे सुजीत, सोनाली आहे सुशीला. आता मधेच अमृता??? हा कोणाचा वशिला???’
जबरदस्त सस्पेंस
हे कॅप्शन पाहून अमृता नेमका कोणाचा वशिला लावून चित्रपटात आली आहे? असा प्रश्न प्रेक्षकांना पडलाय. पोस्टर जबरदस्त आहे. अभिनेत्रीसुद्धा कमाल आहे. आता चित्रपटात एंट्री घेतल्यानंतर ती काय धमाल आणणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. स्वप्नील, सोनाली आणि आता अमृता अशा तीन जबरदस्त कलाकारांची नावे समोर आल्यानंतर ‘सुशीला- सुजीत’ आणखी काय काय सरप्राईज घेऊन येणार? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढली आहे. एकूणच हे प्रकरण नक्की काय आहे ते हळूहळू उलघडतंय आणि हे जाणून घेताना प्रेक्षकांनासुद्धा मजा येतेय.
कधी प्रदर्शित होणार?
प्रसाद ओक लिखित आणि दिग्दर्शित ‘सुशीला – सुजीत’ हा चिरंतपत येत्या 18 एप्रिल 2025 पासून चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची पटकथा आणि संवाद अजय कांबळे यांनी लिहिले आहे. तर प्रसाद ओक, मंजिरी ओक, संजय मेमाणे, निलेश राठी आणि स्वप्निल जोशी हे चित्रपटाचे निर्माते आहेत. पंचशील एंटरटेनमेंट्स आणि बिग ब्रेन प्रॉडक्शन्स प्रस्तुत… ‘सुशीला – सुजीत’मध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि स्वप्नील जोशी मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. अशातच आता अमृताच्या पोस्टरनंतर तिच्या भूमिकेविषयी जाणून घेण्याची उत्सुकता वाढली आहे.
हेही पहा –
Gaurishankar Trailer : वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते ॲक्शनपॅक्ड गौरीशंकरचा ट्रेलर लाँच