घरताज्या घडामोडी‘वेल डन बेबी...’ ओटीटी च्या मार्गावर

‘वेल डन बेबी…’ ओटीटी च्या मार्गावर

Subscribe

आता बॉलिवूडप्रमाणे मराठी चित्रपटसृष्टी देखील आपल्या चित्रपटांसाठी ओटीटी प्लॅटफॉर्मचा विचार करत आहेत. कारण या कोरोनाचा प्रभाव कधी कमी होईल, या साथीमुळे उद्भवलेली परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर चित्रपटगृहांमध्ये रसिक प्रेक्षक येतील का? हे आता कोणालाच सांगता येत नाहीये. अशा वेळी चित्रपटगृहे सुरू व्हायची वाट न पाहता मराठी चित्रपट निर्मातेही आता ओटीटी प्लॅटफॉर्मचा विचार करत आहेत. लवकरच अभिनेता पुष्कर जोग अभिनीत आणि निर्मीत वेल डन बेबी हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणारा हा चित्रपट पहिला मराठी चित्रपट ठरू शकतो.

या चिटापटाबद्दल नेटकऱ्यांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झालीये कारण पुष्कर जोग आणि अमृता खानविलकर हे पहिल्यांदा एकत्र काम करत आहेत.  वेल डन बेबी चे कथानक हे आजच्या आधुनिक तरुण जोडप्याभोवती फिरते. जे त्यांच्या नात्यातला हेतू शोधण्यात अपयशी ठरतात पण नशिबाने त्यांना आणखी एक संधी मिळते. वेल डन बेबी चे दिग्दर्शन प्रियंका तंवर यांनी केले आहे,आनंद पंडित, मोहन नाडर आणि पुष्कर जोग निर्माते आहेत तर प्रमुख भूमिकेत  पुष्कर जोग , अमृता  खानविलकर  आणि  वंदना  गुप्ते दिसणार आहेत.

- Advertisement -

सध्या मराठी भाषेतील १० ते १२ चित्रपट तयार आहेत. केवळ लॉकडाऊन आणि चित्रपटगृह बंद असल्यामुळे हे चित्रपट प्रदर्शित होऊ शकले नाहीत. लॉकडाउनमध्ये शिथिलता मिळाल्याने ती कामेही लवकरच पूर्ण होतील. अशा चित्रपटांच्या निर्मात्यांनी फार काळ वाट न पाहता चित्रपट ‘ओटीटी’वर प्रदर्शित करायला हरकत नाही. असे आवाहनही चित्रपट महामंडळाने केलं होतं.

सध्या या कोरोनाचा काळात चित्रपटगृह सुरू झाली तरी प्रेक्षक चित्रपटगृहात येईल की नाही याबाबत शंका आहे. कारण प्रत्येकाच्याच मनात कोरोनाची भीती आहे. वेल डन बेबी हा चित्रपट १२ जूनला प्रदर्शित होणार होता. पण लॉकडाऊनमुळे तो प्रदर्शित करणं शक्य झालं नाही. पण आता ओटीटी सारखा उत्तम माध्यम आहे. त्यामुळे ‘वेल डन बेबी’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच कधी आणि कुठे प्रदर्शित होईल हे आम्ही जाहीर करू

– पुष्कर जोग, अभिनेता, निर्माता

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -