घरमनोरंजन‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट पाहिल्यावर अमृता खानविलकरची पोस्ट

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट पाहिल्यावर अमृता खानविलकरची पोस्ट

Subscribe

बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा हा गेले काही दिवस त्याच्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे.  त्याचबरोबर या चित्रपटात अभिनयासह लेखन व दिग्दर्शनही केले आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत चांगली कमाई केली असल्याचे पाहायला मिळत आहे. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट पाहिल्यानंतर सामान्य प्रेक्षकांसह मनोरंजन विश्वातील कलाकार मंडळीदेखील या चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. यामध्ये रणदीप हुड्डासह अभिनेत्री अंकिता लोखंडे प्रमुख भूमिकेत झळकली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पत्नी यमुनाबाई सावरकर यांची भूमिका अंकिताने साकारली आहे. या चित्रपटाच्या मराठी स्क्रिनिंगला अमृता खानविलकरने देखील खास उपस्थिती लावली होती.

अंकिता आणि अमृता या दोघीही गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकींच्या मैत्रिणी आहेत. अमृता या आधी लाडक्या मैत्रिणीला पाठिंबा देण्यासाठी ‘बिग बॉस’च्या घरात देखील पोहोचली होती. याशिवाय अंकिताच्या लग्नात सुद्धा अमृताने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाच्या नुकत्याच पार पडलेल्या प्रीमियर शोला सुद्धा तिने हजेरी लावली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

- Advertisement -

 चित्रपट पाहिल्यावर अमृताने रणदीपसह अंकिताचं कौतुक करण्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. अमृताने पोस्ट शेअर करत असं म्हटलं आहे की, “काल ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट मराठीत पाहण्याची संधी मिळाली. या चित्रपटात वीर सावरकरांच्या अदम्य भावनेचे किती मनमोहक चित्रण आहे. रणदीप हुड्डा यांनी अगदी कुशलतेने व प्रभावीपणे ही भूमिका साकारली आहे. तसेच चित्तथरारक छायाचित्रणासह सावरकरांचा प्रवास या चित्रपटातून जिवंत केला आहे. त्याचबरोबर या चित्रपटात असे काही क्षण आहेत जे तुम्हाला वेदना, राग, असहाय्यता पाहायला मिळते.”

“अंकिता लोखंडे तू यमुनाबाई यांची भूमिका अगदी उत्तमरित्या साकारली असून तुझं सादरीकरण अविस्मरणीय आहे. हॅट्स ऑफ टू यू अंकु… क्या बात हैं! आणि सर्वात शेवटी मी कौतुक करेन सुबोध भावेचं…तुझ्या आवाजात जादू आहे. तुझ्या आवाजामुळे मला चित्रपटातील प्रत्येक शब्द, प्रत्येक कृती आणि भावना यांचं गांभीर्य जाणवलं. खूपच उत्कृष्ट” अशी पोस्ट शेअर करत अमृताने या चित्रपटाचं कौतुक केलं आहे.

- Advertisement -

दरम्यान, अमृताने शेअर केलेल्या पोस्टवर अंकिता, सुबोध भावे यांनी कमेंट करत तिचे आभार मानले आहेत. याशिवाय ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट 22 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. गेल्या काही दिवसांपासून हिंदीसह मराठी बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने यशस्वी घोडदौड केली आहे. रणदीप हुड्डा, अंकिता लोखंडे, अमित सियाल या कलाकारांनी यामध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -