घरमनोरंजन‘सत्यमेव जयते’मध्ये अमृता खानविलकरची सरप्राईज भूमिका!

‘सत्यमेव जयते’मध्ये अमृता खानविलकरची सरप्राईज भूमिका!

Subscribe

राझी सिनेमानंतर आता अमृता बॉलिवुडच्या सत्यमेव जयते या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अमृताने सरिता नावााचे पात्र साकारले आहे.

अभिनेत्री अमृता खानविलकरसाठी २०१८ हे वर्ष अतिशय खास ठरलं. या वर्षातील अमृताचा प्रवास तिच्या उत्तम अभिनय आणि नटखट अदांमुळे प्रेक्षकांना चांगलाच लक्षात राहिला. अमृता नेहमीच एकापेक्षा एक दमदार पात्र साकारून प्रेक्षकांना सरप्राईज करत आहे. लवकरच अमृता ‘सत्यमेव जयते’ या चित्रपटाच्या माध्यमातून एका पोलिसाची पत्नी ‘सरिता’ हे पात्र साकारत आहे. मेघना गुलझार दिग्दर्शित ‘राझी’ या चित्रपटात अमृताने पाकिस्तानी आर्मीची पत्नी ‘मुनिरा’ आणि त्यानंतर ‘डॅमेज’ या वेब सिरीजमधील ‘लोव्हिना’ हे सिरीयल किलरचं पात्र साकारलं. या सर्व पात्रांच्या सादरीकरणानंतर अमृताचं ‘सरिता’ हे पात्र बघून प्रेक्षक पुन्हा एकदा सरप्राईज होतील यात शंकाच नाही.

अशी आहे सरिता…

मिलाप झवेरी दिग्दर्शित ‘सत्यमेव जयते’ या चित्रपटात अमृता अभिनेते मनोज बाजपेयी यांच्या पत्नीची म्हणजेच सरिताची भूमिका साकारत आहे. अमृतासाठी सरिताची भूमिका ही अगदी सोपी होती, यासाठी तिला विशेष असे कष्ट घ्यावे लागले नाहीत. कारण खऱ्या आयुष्यात जसा अमृताचा स्वभाव आहे, अगदी तसाच हुबेहूब सरिताचा आहे. जसे की अमृता जशी खोडकर, मस्तीखोर, प्रेमळ तशीच सरिता देखील आहे. विशेष म्हणजे काय बरोबर, काय चूक याची योग्य जाणीव जशी अमृताला आहे तशीच सरिताला पण आहे. या चित्रपटाच्या आणि पात्राच्या निमित्ताने अमृताचा खरा स्वभाव आणि तिचे विचार या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळतील. तसेच मनोज बाजपेयी आणि मनमिळावू अमृता यांची पती-पत्नीची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री कशी असेल? हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरेल.

- Advertisement -

जॉन अब्राहमची प्रमुख भूमिका

मिलाप झवेरी दिग्दर्शित ‘सत्यमेव जयते’ या चित्रपटात अभिनेता जॉन अब्राहमची प्रमुख भूमिका असून हा चित्रपट येत्या १५ ऑगस्ट रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात जॉनने एका सिरिअल किलरची भूमिका साकारली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -