घरमनोरंजनकोरोना लस मिळताच गोठलेल्या तलावावर केला भांगडा...तरुणाचा व्हिडिओ व्हायरल

कोरोना लस मिळताच गोठलेल्या तलावावर केला भांगडा…तरुणाचा व्हिडिओ व्हायरल

Subscribe

कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी कोरोना लसीकरणाला सुरुवात झाल्यावर नागरिकांना दिलासा मिळाला आहे. याचा आनंद साजरा् करण्यासाठी भारतातील एका तरुणाने भांगडा करतानाचा त्याचा एक व्हिडिओ केला आहे.

कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला चांगलाच सासुरवास केला असून आजही संपूर्ण जगावर कोरोनाची दहशद आहे. मात्र आता कोरोना प्रतिबंधासाठी लसीकरणाचा पर्याय खुला झाल्यावर नागरिकांना दिलासा मिळाला आहे. जगभरात कोरोना लसीकरणाचे कार्यक्रम सुरु झाले आहेत. यातच कॅनडाचा डान्सर गुरदीप पंधेरने २ मार्चला कोरोना लशीचा पहिला डोस घेतला आहे. डोस घेतल्यानंतर त्यांनी आपल्या वेगळ्याच अंदाजात याचा आनंद व्यक्त केला आहे. लस घेतल्यानंतर गुरदिपने बर्फ झालेल्या एका तलावावर भांगडा केला. हा भांगडा केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. गुरदीपच्या या अनोख्या अंदाजाला लोकांची जबरदस्त पसंती मिळत आहे. तसेच लोक त्याच्या भांगड्याची जबरदस्त तारीफ करताना दिसत आहेत.

गुरदीपच्या या व्हिडिओला ट्विटर वर २६ लाखाहून अधिक जणांनी बघितला आहे. गुरदीपने हा व्हिडिओ त्याच्या ट्विटरवर शेअर करत आपल्या चाहत्यांना लस घेतल्यानंतर तो थेट युकोन येथे गेला व याचा आनंद व्यक्त करण्यासाठी त्याने जबरदस्त भांगडा केला. त्याच्या या पोस्ट मध्ये त्याने त्याचा डान्सचा ५५ सेकंदाचा व्हिडिओ शेअर केला असून त्यात तो एका गोठलेल्या तलावालर नाचताना दिसत आहे. पोस्ट मध्ये,”काल सायंकाळी मला कोविड-१९ लशीचा पहिला डोस मिळाला. यानंतर मी माझा आनंद व्यक्त केला गोठलेल्या तलावावर गेले आणि भांगडा केला”.असे लिहिले आहे.

- Advertisement -

हे वाचा-http://गॅंगस्टर विकास दुबेचा एन्काऊंटर मोठ्या पडद्यावर, चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -