सफलतेची एक प्रेरणादायी गोष्ट… कंगना रनौतने एकनाथ शिंदेंना दिल्या खास शुभेच्छा

कंगना रनौतने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एकनाथ शिंदे यांचा एक फोटो शेअर केला, शिवाय या फोटोसोबत त्याने एक कॅप्शनसुद्धा दिले.त्यात तिने लिहिलंय की, "सफलतेची एक प्रेरणादायी गोष्ट...

राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय संघर्षानंतर अखेर काल शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात आली, तसेच देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले. काल संध्याकाळी ७:३० च्या सुमारास राजभवनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मंत्री पदाची शपथ घेतली. एकनाथ शिंदेंच्या दहा दिवसाच्या बंडाचे फळ त्यांना मिळाला. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आता सामाजिक , राजकीय, सामान्य जनता तसेच मनोरंजन सृष्टीतील कलाकारांकडूनही एकनाथ शिंदेंना अनेक शुभेच्छा दिल्या जात आहेत. नुकतीच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने एकनाथ शिंदेंना शुभेच्छा दिल्या आहेत.

कंगना रनौत सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर कंगनाने उद्धव ठाकरेंना एका व्हिडीओद्वारे टोला लगावला. दरम्यान काही वेळाने एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच कंगनाने एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्या.

कंगना रनौतने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एकनाथ शिंदे यांचा एक फोटो शेअर केला, शिवाय या फोटोसोबत त्याने एक कॅप्शनसुद्धा दिले.त्यात तिने लिहिलंय की, “सफलतेची एक प्रेरणादायी गोष्ट…ऑटो रिक्षा चालवण्यापासून ते देशाचे एक महत्वपूर्ण आणि शक्तिशाली व्यक्ति बनण्यापासून…तुम्हाला खूप शुभेच्छा सर”.

कंगना रनौत भारतीय जनता पार्टीची कट्टर समर्थक आहेत.कंगना वारंवार आपल्या बेधडक बोलण्यामुळे वादाच्या कचाट्यात सापडत असते. नुकताच तिने आपल्या सोशल मीडियावर शिवसेनेबाबत आपलं मत व्यक्त केले होते. सध्या तिचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.


हेही वाचा :सावरकरांचा अपमान करणं थांबव नाहीतर…अभिनेत्री स्वरा भास्करला धमकीचं पत्र