Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन आनंद महिंद्रा यांनी ट्वीट शेअर करत केलं राम चरणचं कौतुक

आनंद महिंद्रा यांनी ट्वीट शेअर करत केलं राम चरणचं कौतुक

Subscribe

साऊथचे दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या ‘RRR’ चित्रपटाने गेल्या वर्षभरापासून नवनवीन रेकॉर्ड बनवले आहेत. या चित्रपटाला फक्त भारतीय प्रेक्षकांचीच नव्हे तर संपूर्ण जगभरातील प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याने गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळवला होता. शिवाय आता या चित्रपटातील नाटू नाटू गाण्याला ऑस्करसाठी नामांकन मिळलं आहे. अनेकजण या चित्रपटातील कलाकार राम चरण आणि ज्युनिअर एनटीआरचं कौतुक करत आहेत. अशातच आता उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी देखील राम चरणचं कौतुक केलंय.

आनंद महिंद्रा यांचे ट्वीट चर्चेत

उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवर राम चरणचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ अमेरिकेच्या प्रसिद्ध गुड मॉर्निंग शोमधील आहे. ज्यात राम चरणने चित्रपटाशी संबंधित काही प्रश्नांचे उत्तर दिले होते. या व्हिडीओसोबत आनंद महिंद्रा यांनी कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “हा व्यक्ती ग्लोबल स्टार आहे.”

- Advertisement -

आनंद महिंद्रा यांच्या या पोस्टला राम चरणने रिट्विट करत आभार मानले आहेत. राम चरणने लिहिलंय की, खूप खूप धन्यवाद सर! भारताची वेळ आता प्रत्येक क्षेत्रात चमकण्याची आहे.

दरम्यान, ‘RRR’ चित्रपट एक पीरियड ड्रामा चित्रपट आहे ज्यामध्ये ज्युनियर एनटीआर आदिवासी नेता भीम आणि राम चरण क्रांतिकारकाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटाद्वारे आलिया भट्टने टॉलिवूडमध्ये पदार्पण केले. याशिवाय अजय देवगण, श्रिया सरन, समुथिरकणी, रे स्टीव्हन्सन, मकरंद देशपांडे आणि ऑलिव्हिया मॉरिस या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसत आहेत.


हेही वाचा :

कोरिया दूतावासातील कर्मचाऱ्यांना ‘नाटू नाटू’ गाण्याची भूरळ; नरेंद्र मोदींनी केलं कौतुक

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -