Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटने घेतलं तिरुपती बालाजीचे दर्शन

अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटने घेतलं तिरुपती बालाजीचे दर्शन

Subscribe

रिलायन्स उद्योग समूहाचे मालक आणि भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा 19 जानेवारीला साखरपुडा पार पडला. अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया निवासस्थानी हा साखरपुडा झाला होता. गुजराती रितीरिवाजाप्रमाणे हा साखरपुडा पार पडला होता. साखरपुड्यापासून अनंत अंबानी आणि राधिका सोशल मीडियावर सतत चर्चेत आहेत. त्यांच्या साखरपुड्याचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, आता साखरपुड्यानंतर पहिल्यांदाच अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट एकत्र दिसले. भावी पत्नीसोबत अनंत अंबानी तिरुपती बालाजीच्या दर्शनाला गेले होते.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटने घेतलं तिरुपती बालाजीचे दर्शन

- Advertisement -

साखरपुड्यानंतर पहिल्यांदाच अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट एकत्र दिसले. गुरुवारी दोघेही जोडीने तिरुपती बालाजीच्या दर्शनाला गेले होते. यावेळी अनंत अंबानी यांनी पांढऱ्या रंगाचे धोतर परिधान केले होते तर राधिकाने सलवार कुर्ता परिधान केला होता. यावेळी जोडीने तिरुपती बालाजीचं दर्शन घेतलं. सोशल मीडियावर दोघांचा तिरुपतीदरम्यानचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. शिवाय अनेकजण त्यांचं कौतुक देखील करत आहेत.

कोण आहे राधिका मर्चंट?
राधिका मर्चंट ही एनकोर हेल्थकेअरचे सीईओ वीरेन मर्चंट आणि शैला मर्चंट यांची मुलगी आहे. रधिका आणि अनंत गेली अनेक वर्षे एकमेकांचे मित्र आहेत. 28 वर्षीय राधिका एक ट्रेंड डान्सर आहे. राधिकाने श्री निभा आर्ट्सच्या गुरु भावना ठाकर यांच्याकडून भरतनाट्यम शिकली आहे. राधिकाचे कुटुंब गुजरातमधील कच्छ येथील आहे. 18 डिसेंबर 1994 रोजी मुंबईत जन्मलेल्या राधिकाने तिचे शालेय शिक्षण मुंबईतील ककॅथेड्रल, जॉन कॉनन स्कूल आणि इकोले मोंडियाल वर्ल्ड स्कूलमधून पूर्ण झालं. यानंतर तिने न्यूयॉर्क विद्यापीठातून राजकारण आणि अर्थशास्त्र या विषयात पदवी घेतली. पदवीपर्यंतच्या शिक्षणानंतर राधिका 2017 मध्ये रिअल इस्टेट फर्म Isprava टीममध्ये सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करु लागली, राधिकाला वाचनाची, ट्रेकिंगची आणि पोहण्याची आवड आहे. दरम्यान 2018 मध्ये राधिका आणि अनंत अंबानी यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तेव्हापासून दोघांच्या नात्यावर चर्चा सुरु होत्या आणि आता अखेर दोघांचा साखरपुडा पार पडला आहे.

- Advertisement -

 


हेही वाचा :

तो एक सज्जन व्यक्ती… शाहरुखवर टीका करणाऱ्यांना जावेद अख्तर यांचं सडेतोड उत्तर

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -