HomeमनोरंजनAnant-Radhika Wedding Cost : अंबानींचा 3000 कोटींचा शाही लग्नसोहळा

Anant-Radhika Wedding Cost : अंबानींचा 3000 कोटींचा शाही लग्नसोहळा

Subscribe

Anant Ambani-Radhika Merchant Wedding : अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नसोहळ्याची चर्चा गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरू होती. अखेर तो दिवस उजाडला. आज 12 जुलै रोजी अनंत आणि राधिका लग्नबंधनात अडकणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून अनंत- राधिका यांच्या लग्नापूर्वीच्या विधी सुरु होत्या. संगीत, हळदी आणि मेहंदी कार्यक्रमात सेलिब्रिटींनी देखील हजेरी लावली होती. सप्तपदी होण्यापूर्वी अंनत आणि राधिका यांच्यासाठी खास पूजा ठेवण्यात आली आहे. अंनत आणि राधिका यांच्या लग्नाची चर्चा संपूर्ण जगात होत आहे. राधिका- अनंत यांच्या लग्नासाठी परदेशी पाहुणे देखील भारतात पोहोचत आहेत. अंनत आणि राधिका यांचं लग्न जगातील सर्वात महागड्या लग्नापैकी एक आहे.

अनंत-राधिकाचा पहिला प्री-वेडिंग सोहळा मार्च महिन्यात गुजरातमधील जामनगर येथे पार पडला. या सोहळ्यात रिहानाने परफॉर्मन्स केला होता, जो चर्चेत होता. या प्री-वेडिंगमध्ये एक हजार कोंटीचा खर्च करण्यात आला होता. हा सोहळा गुजरातमधील जामनगर येथे 1 ते 3 मार्च दरम्यान आयोजित करण्यात आला होता. या प्री-वेडिंग सेरेमनीसाठी बॉलीवूडपासून हॉलिवूडपर्यंतच्या स्टार्सनी सहभाग घेतला. ज्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.

अनंत अंबानी – राधिका मर्चंट यांच्या दुसऱ्या प्री-वेडिंगबद्दल सांगायचं झालं तर, सेरेमनीतं इटली याठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं. दुसऱ्या प्री-वेडिंगसाठी देखील सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. पार्टी क्रुझमध्ये झाली होती. यामध्येही मनोरंजन आणि व्यवसाय जगतातील प्रसिद्ध व्यक्ती उपस्थित होत्या. तेव्हा अंबानी कुटुंबाने त्यांच्या पाहुण्यांसाठी 10 चार्टर फ्लाइट्स बुक केल्या होत्या. शिवाय त्यांची सोय लक्षात घेऊन 12 खाजगी विमानांची व्यवस्था करण्यात आली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अंबानी कुटुंबाने इटलीमध्ये आयोजित केलेल्या या कार्यक्रमावर अंदाजे 500 कोटी रुपये खर्च केले.

अनंत-राधिकाच्या या लग्नसोहळ्यात अनेक पाहुण्यांचादेखील समावेश असणार आहे. या सगळ्यांना रिटर्न गिफ्ट म्हणून कोटींची घड्याळं मिळणार आहेत. बाकीच्या पाहुण्यांना काश्मीर, बनारस आणि राजकोटवरून मागवलेल्या खास भेटवस्तू दिल्या जाणार आहेत. अनंत-राधिकाच्या लग्नासाठी अंबानी कुटुंब तब्बल तीन हजार कोटी रुपये खर्च करत आहेत.

हेही वाचा : Nita Ambani : नीता अंबानींच्या ट्रेडिशनल लूकने वेधले लक्ष


Edited By : Nikita Shinde