घरमनोरंजन'अन्य' चित्रपटाचा धडाकेबाज ट्रेलर लाँच

‘अन्य’ चित्रपटाचा धडाकेबाज ट्रेलर लाँच

Subscribe

हिंदीसह मराठीतही बनलेला ‘अन्य’ हा आगामी सिनेमा मागील बऱ्याच दिवसांपासून सिनेसृष्टीसोबतच रसिकांचेही कुतूहल वाढवत आहे. आगामी बहुप्रतिक्षीत सिनेमांच्या यादीतील महत्त्वपूर्ण चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘अन्य’चा धडाकेबाज ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. १० जून रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. उत्सुकता वाढवणाऱ्या ‘अन्य’च्या ट्रेलरला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाल्यानं सध्या सोशल मीडियापासून डिजिटल माध्यमांमध्येही याच चित्रपटाची चर्चा आहे.

ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल आणि टोरंटो इंडिपेन्डंट फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटानं कौतुकाची थाप मिळवली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन दक्षिणात्य सिनेसृष्टीतील नामवंत दिग्दर्शक सिम्मी जोसेफ यांनी केलं आहे. प्रत्येक माणसात कुणी अन्य, कुणी दुसरा असतोच… तसाच प्रत्येक चांगल्या माणसातसुद्धा वाईट माणूस असतो… आणि प्रत्येक वाईट माणसात कुणी अन्य, कुणी दुसरा चांगला माणूससुद्धा असतो… असा विचार मांडणारा हा चित्रपट एका चांगल्या ‘अन्य’ची कथा सांगणारा असल्याचं प्रथमदर्शनी ट्रेलर पाहिल्यावर जाणवतं. हेरगिरी, सत्य परिस्थिती, सेक्स ट्रॅफिकींग, बालमजूरी, अनाथांची व्यथा, शेतकऱ्यांच्या आत्महत्या या आजघडीच्या महत्त्वाच्या मुद्द्यांना स्पर्श करणारा ‘अन्य’ देशात बदल घडवणारे विचार सादर करणारा असल्याचं ट्रेलरमध्ये पहायला मिळतं. सत्य घटनांवर आधारलेला हा चित्रपट मानव तस्करीवर प्रकाशझोत टाकणारा आहे. एका डॅाक्युमेंट्रीचा आधार घेऊन समाजातील कटू वास्तव आणि भयावह सत्य सादर करण्याचा प्रयत्न ‘अन्य’ करण्यात आला आहे.

- Advertisement -

सिम्मी यांनीच या चित्रपटाचं लेखनही केलं असून, संवादलेखन महेंद्र पाटील यांनी केलं आहे. अतुल कुलकर्णी, प्रथमेश परब, तेजश्री प्रधान, भूषण प्रधान, कृतिका देव, सुनील तावडे हे मराठीतील आघाडीचे कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत. यांच्या जोडीला हिंदीसह बंगाली सिनेसृष्टीतही नावलौकीक मिळवलेली अभिनेत्री रायमा सेन, हिंदी सिनेसृष्टीतील यशपाल शर्मा आणि गोविंद नामदेव हे कलाकारही ‘अन्य’मध्ये वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. हिंदी सिनेमासाठी डॅा. सागर आणि सजीव सारथी यांनी, तर मराठीसाठी प्रशांत जामदार यांनी गीतं लिहीली आहेत. संगीतकार विपीन पटवा यांच्यासह राम नाथ, रिषी एस. आणि कृष्णा राज यांनी या गीतांना संगीत दिलं आहे.

- Advertisement -

 


हेही वाचा :अक्षय कुमारच्या ‘पृथ्वीराज’ चित्रपटाचे नाव आता ‘सम्राट पृथ्वीराज’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -