…आणि रणवीर रस्त्यावरच झोपला; ‘कॉफी विथ करण’मध्ये रणवीरने केला खुलासा

'कॉफी विद करण'मध्ये या वेळी बऱ्याच नवीन गोष्टी पाहायला मिळाल्या. शो मध्ये सर्वात आधी कॉफी बिंगोया सेशन पासून सुरूवात झाली

मागील अनेक दिवसांपासून ‘कॉफी विद करण’ चे चाहते ७ जुलैच्या विशेष एपिसोडची आतुरतेने वाट पाहत होते. ‘कॉफी विद करण’ हा टेलिव्हिजनवरील खूप लोकप्रिय कार्यक्रम आहे. जो सध्या यावेळी Disney + Hotstar वर प्रसारित होत आहे. काल हा एपिसोड पार पडला, या एपिसोडमध्ये अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणवीर सिंह यांनी हजेरी लावली होती. यावेळी दोघांनी करण जौहरसोबत दिलखुलास गप्पा मारल्या. तसेच आपल्या आयुष्यातील अनेक गमतीदार किस्से सुद्धा शेअर केले.

कॉफी बिंगोपासून झाली सुरूवात
‘कॉफी विद करण’मध्ये या वेळी बऱ्याच नवीन गोष्टी पाहायला मिळाल्या. शो मध्ये सर्वात आधी कॉफी बिंगोया सेशन पासून सुरूवात झाली. यामध्ये आलिया आणि रणवीरला त्या गोष्टींवर गोल करायचा होता, ज्या गोष्टी त्यांच्या आयुष्यात झाल्या आहेत. कॉफी बिंगोची सुरूवात रणवीरपासून झाली. या वेळी त्याला करणने विचारले की, तू कधी सकाळी उठल्यावर स्वताःला अनोळखी ठिकाणी पाहिलं आहेस का? त्यावेळी त्याने सांगितलं की, त्याच्या आयुष्यात एक क्षण असा होता, जेव्हा तो झोपेतून जागा झाला, तेव्हा तो फूटपाथवर झोपलेला होता. रणवीर सिंहचा हा किस्सा ऐकूण आलिया आणि करण आश्चर्यचकित होण्याऐवजी मोठमोठ्याने हसू लागले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

दरम्यान आलिया आणि रणवीर सिंहच्या येण्याने ‘कॉफी विद करण’ची सुरूवात चांगली झाली. तसेच यावेळी अनेक मजेदार किस्से सुद्धा समोर आले. आलिया आणि रणवीर सिंहची मैत्री सुद्धा अनेकांना आवडली.


हेही वाचा :‘द इम्मोर्टल अश्वत्थामा’ चित्रपटात समंथा आणि विक्की कौशल एकत्र