पत्रकाराशी गैरवर्तन केल्याप्रकरणी सलमान खानला समन्स, काय आहे प्रकरण ?

. ३ वर्षांपूर्वी झालेल्या वादाप्रकरणी सलमानला हे समन्य बजावण्यात आले आहेत. कोर्टाकडून भारतीय दंडसंहितेच्या कलम ५०४ आणि ५०६ अंतर्गत सलमान गुन्हा दाखल करुन न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

andheri court summoned salman khan for misbehaved with journalist
पत्रकाराशी गैरवर्तन केल्याप्रकरणी सलमान खानला समन्स, काय आहे प्रकरण ?

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानला काही दिवसांपूर्वी काळवीट प्रकरणी कोर्टाने दिलासा होता. परंतु सलमानच्या अडचणीत आता पुन्हा वाढ झाली आहे. मुंबईत पत्रकाराशी गैरवर्तन केल्या प्रकरणी सलमान खानला अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने समन्स बजावले आहेत. पत्रकार अशोक पांडे यांनी ही तक्रार दाखल केली आहे. सलमान खानसह त्याच्या बॉडीगार्डला ५ एप्रिलला कोर्टात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ३ वर्षांपूर्वी झालेल्या वादाप्रकरणी सलमानला हे समन्य बजावण्यात आले आहेत. कोर्टाकडून भारतीय दंडसंहितेच्या कलम ५०४ आणि ५०६ अंतर्गत सलमान गुन्हा दाखल करुन न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

काय आहे प्रकरण ?

हे प्रकरण ३ वर्षापूर्वीचे म्हणजेच २०१९ चे आहे. २४ एप्रिल २०१९म रोजी पत्रकार अशोक पांडे यांनी मुंबईच्या रस्त्यावर सायकल चालवत असलेल्या सलमान खानचा व्हिडीओ शूट केला होता. व्हिडीओ काढल्यामुळे सलमान आणि त्याच्या बॉडीगार्डने माझ्याशी असभ्य आणि गैरवर्तन केले. तसेच माझा फोन देखील हिसकावून घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप अशोक यांनी केला आहे.

अशोक यांनी तक्रारीत म्हटले आहे की, ते त्यांच्या कॅमेरामनसोबत जुहू येथील कांदिवलीला जात होते. रस्त्यात त्यांना सलमान खान सायकल चालवताना दिसला. सलमान खान आणि त्याच्या बॉडीगार्डची परवानगी घेऊन मी सलमानचा व्हिडीओ काढला. परंतु व्हिडिओ शूट करत असताना त्याच्या दोन्ही बॉडीगार्डने माझ्या हातातून फोन हिसाकावून घेत मला मारहाण केली.

पत्रकार अशोक पांडे यांनी या प्रकरणी अंधेरीच्या डी. एन. नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. परंतु सलमान विरोधात तक्रारीवर कारवाई न करता पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. त्याचप्रमाणे सलमान खान आणि त्याच्या बॉडीगार्डने मला शिवागाणी केल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.


हेही वाचा – Blackbuck Poaching Case : काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानला दिलासा; आता सर्व प्रकरणावर सुनावणी हायकोर्टातच होणार