घरमनोरंजनअ‍ॅंजेलिना-ब्रेडला मिळाली मुलांची जॉइंट कस्टडी,अ‍ॅंजेलिनाने केली न्यायाधीशांवर टीका

अ‍ॅंजेलिना-ब्रेडला मिळाली मुलांची जॉइंट कस्टडी,अ‍ॅंजेलिनाने केली न्यायाधीशांवर टीका

Subscribe

न्यायाधीश जॉन ऑडरकर्क यांनी मुलांच्या साक्ष देण्याची परवानगी देण्यात आली नाही. याचा देखील अ‍ॅंजेलिनाने विरोध केला आहे या उलटपक्षी ब्रॅंन्ड पिट याने न्यायाधीश जॉन ऑडरकर्क निर्णयाचे स्वागत केले आहे.

जगप्रख्यात अभिनेत्री अ‍ॅंजेलिना हिच्या मुलांच्या कस्टडीसाठी गेल्या पाच वर्षापासून कायदेशीररित्या लढाई लढत आहे आणि त्याचा निकाल आता लागला आहे. कोर्टाने ब्रेड पिट आणि अ‍ॅंजेलिना यांना मुलांची जॉइंट कस्‍टडीचा निर्णय देण्यात आला आहे. तसेच अ‍ॅंजेलिनाने 2016 साली घटस्फोटाची देखील मागणी केली होती. तेव्हापासून दोघामधील मुलांच्या कस्टडी वरुन वाद उफाळून आला होता. या केसच्या सुनावणीकरिता एका खाजगी न्यायाधीश जॉन ऑडरकर्क यांना ठेवण्यात आले होते. पण ॲजेलिनाने कोर्टाच्या या निकालावर नाराजी जाहीर केली आहेअ‍ॅंजेलिना आणि ब्रेड पिट यांना एकूण 6 मूलं आहेत. अ‍ॅंजेलिनाला मुलांची कस्टडी वडिलांकडे जावी असे कधीच वाटत नव्हते. पण ब्रेड पिट आता अत्यंत आनंदी दिसत आहे त्यांना मुलांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्याची संधि मिळेल. 6 मुलांपैकी 3 मूलं त्यांची स्वत:ची आहेत आणि 3 मुलांना त्यांनी दत्तक घेतले होते. तसेच त्यांच्या सर्वात मोठा मुलगा 19 वर्षाचा असल्याने अधिकृतरीत्या त्याच्यावर या कस्टडी मधील कोर्टाचा कोणताही नियम लागू होत नाही.

- Advertisement -

अ‍ॅंजेलिना जॉलीने कोर्टाद्वारे देण्यात आलेल्या निर्णयावर खुश नसल्याचे जाहीर केले आहे. न्यायाधीश जॉन ऑडरकर्कने प्रोफेशनल थेरपिस्‍ट्स सारख्या अनेक लोकांची साक्ष घेतल्यानंतर जॉइंट कस्टडीचा निर्णय घेतला आहे.असोशिएट प्रेसच्या रिपोर्ट नुसार अ‍ॅंजेलिना न्यायाधीश जॉन ऑडरकर्क याच्यावर टीका केली आहे. न्यायाधीश जॉन ऑडरकर्क यांनी निपक्ष रित्या केसाची सुनावणी केली नाही. मुलांच्या आरोग्याच्या,सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून हा निर्णय घेण्यात आला नाहीये अनू हा मुद्दा सर्वाधिक महत्वाचा आहे. तसेच न्यायाधीश जॉन ऑडरकर्क यांनी मुलांच्या साक्ष देण्याची परवानगी देण्यात आली नाही. याचा देखील अ‍ॅंजेलिनाने विरोध केला आहे या उलटपक्षी ब्रेड पिट याने न्यायाधीश जॉन ऑडरकर्क निर्णयाचे स्वागत केले आहे.


हे हि वाचा – मायावतींवर विनोदामुळे रणदीप हुड्डा वादाच्या भोवऱ्यात, होतोय ट्रोलर्सचे टार्गेट

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -