घरमनोरंजन'हा' कलाकार ठरला भारतीय रंगभूमीचा अखेरचा सुपरस्टार!

‘हा’ कलाकार ठरला भारतीय रंगभूमीचा अखेरचा सुपरस्टार!

Subscribe

आणि डॉ.काशीनाथ घाणेकर या बहुचर्चीत चित्रपटाचा दुसरा टिझर प्रेक्षकांसमोर आला आहे. पहिल्या टीझरमध्ये चित्रपटातील इतर पात्रांची ओळख आपल्याला झाली होती. तर हा संपूर्ण टीझर घाणेकरांवर केंद्रीत करण्यात आला आहे.

मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीचा अखेरचा सुपरस्टार अर्थात डॉ. काशीनाथ घाणेकर. ज्यांच्या केवळ नावाने मराठी रसिकांना तिकीटबारीवर खेचून आणले. ज्यांच्यासाठी पहिल्या टाळ्या वाजल्या अशा सुपरस्टारवर लवकरच आणि डॉ. काशीनाथ घाणेकर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या बहुचर्चित चित्रपटाचा दुसरा टीझर नुकताच प्रेक्षकांसमोर आला आहे.

नाटकाच्या फलकावर शेवटचं नाव लावण्याची प्रथा काशीनाथ घाणेकर यांनी पहिल्यांदा सुरू केली. ‘काशीनाथ घाणेकर भारतीय रंगभूमीचा पहिला नव्हे अखेरचा सुपरस्टार आहे’ अशी दमदार वाक्य आपल्याला या दुसऱ्या टीझरमध्ये पाहायला मिळतात. चित्रपटाच्या पहिल्या टीझरमध्ये या चित्रपटातील कलाकारांची ओळख आपल्याला झाली. या पात्रांच्या तोंडी असणाऱ्या संवादांवरून इतर कलाकारांच्या मनात घाणेकरांबद्दल नाराजी असल्याचं कळतं, आणि आता या दुसरा टीझर संपूर्ण घाणेकरांवर केंद्रीत करण्यात आला आहे.

- Advertisement -

कोण होते काशीनाथ घाणेकर?

काशीनाथ घाणेकर हे मराठी चित्रपटसृष्टी आणि मराठी रंगभूमीवर गाजलेलं नाव. मराठी रंगभूमीला काशीनाथ घाणेकर यांनी वैभव मिळवून दिले. मराठी रंगभूमीला काशीनाथ घाणेकर यांनी एका वेगळ्या स्थानावर नेऊन ठेवले. महान रंगकर्मी डॉ. काशिनाथ घाणेकर यांचा प्रवास विलक्षण आणि थक्क करणारा आहे. हाच प्रवास आता रुपेरी पडद्यावर येत आहे. दिग्दर्शक अभिजीत देशपांडे दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेता सुबोध भावे ही भूमिका साकारत आहे.

नाटक, चित्रपटातील भूमिका गाजल्या

ज्येष्ठ कलाकार डॉ. काशीनाथ घाणेकर यांनी अनेक नाटक आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांच्या कितीतरी भूमिका अजरामर झाल्या आहेत. यामध्ये ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘इथे ओशाळला मृत्यू’, ‘अश्रूंची झाली फुले’, ‘गारंबीचा बापू’, ‘आनंदी गोपाळ’, ‘शितू’, ‘तुझे आहे तुजपाशी’, ‘सुंदर मी होणार’, ‘मधुमंजिरी’ या नाटकांचा समावेश आहे. तर ‘हा खेळ सावल्यांचा’, ‘पडछाया’, ‘अभिलाषा’, ‘मराठा तितुका मेळावा’, ‘भव्य’, ‘पाठलाग’, ‘झेप’, ‘मधुचंद्र’, ‘देव माणूस’ या चित्रपटातील त्यांच्या भूमिका गाजल्या आहेत.

- Advertisement -

सुबोध भावेसोबत चित्रपटात सुमीत राघवन, सोनाली कुलकर्णी, प्रसाद ओक यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिजीत देशपांडे यांनी केलं आहे. या चित्रपटात काशीनाथ घाणेकरांच्या आयुष्यातील चढउतार दाखवण्यात आले आहेत. ७ नोव्हेंबरला दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -