प्रिया आणि उमेश तिसऱ्यांदा विचारणार …आणि काय हवं?

आणि काय हवं याच्या दोनही भागांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभला होता आता या वेबसिरिजच्या तिसऱ्या भागाच्या चित्रिकरणाला सुरुवात झाली आहे.

मराठी चित्रपट सृष्टीतील क्यूट कपल म्हणजे प्रिया बापट आणि उमेश कामत यांची ऑनस्क्रिनसोबतच ऑफस्क्रिन कॅमिस्ट्रीही फार छान आहे. उमेश आणि प्रिया पुन्हा एकदा ऑनस्क्रिनवर एकत्र पाहायला मिळणार आहे. .. ‘आणि काय हवं’ ही मराठी वेबसिरीज तरुणाई मध्ये खूपच प्रसिद्ध झाली होती. उमेश आणि प्रियाची या जोडीची चांगलीचं पसंत पडली होती. प्रेक्षकांनी या वेबसिरीजला भरभरून प्रेम दिलं होतं. त्यामुळेच त्याचा दुसरा भागसुद्धा तयार करण्यात आला होता. आता या सिरीजचा तिसरा सिजन हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षकांच्या या तुफान प्रतिसादामुळे ‘आणि काय हवं’ वेबासिरीजच्या तिसऱ्या भागाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. उमेशने स्वत: सोशल मीडियावर याची माहिती दिली आहे. याबाबत ची पोस्ट उमेशने शेअर केली असून त्यात, अखेरीस शूटींगला सुरुवात झालेली आहे… आणि काय हवं? … season 3.

 

View this post on Instagram

 

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

या सिरिजमध्ये प्रिया आणि उमेश हे जुई आणि साकेतची भूमिका साकारत आहेत. यापूर्वी या सिरिजचे दोन भाग प्रदर्शित करण्यात आले होते. तर आता तिसऱ्या भागाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. … आणि काय हवं? च्या तिसऱ्या सिझनमध्ये जुई आणि साकेतची कोणती नवी गोष्ट असणार हे पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये नक्कीच उत्सुकता असणार आहे.


हे वाचा- ‘रहना है तेरे दिल मै २’ मध्ये दिसणार ‘क्रिती सेनन’ अभिनेत्री