अनिकेतची सासू अन् मावशी होत्या जिवलग मैत्रिणी, अशी सुरू झाली अनिकेत स्नेहाची लव्ह स्टोरी

दोघांनीही एकत्र सिनेमा केला होता त्यामुळे दोघांनीही हसत हसत लग्नासाठी होकार दिला होता.

Aniket vishwasrao and sneha chavan vishwasrao love story
अनिकेतची सासू अन् मावशी होत्या जिवलग मैत्रिणी, अशी सुरू झाली अनिकेत स्नेहाची लव्ह स्टोरी

छोट्या पडद्यावर आपल्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला अभिनेता अनिकेत विश्वासराव सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे तो म्हणजे त्याची बायको स्नेहा विश्वासराव हिने केलेल्या  हिंसाचाराच्या गंभीर आरोपांमुळे. स्नेहा विश्वासराव हिने अनिकेतसह सासू सासऱ्यांवर कौंटुबिक हिंसाचार आणि मारणार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. नवरा आणि सासू सासऱ्यांनी मिळून स्नेहाचा शारीरिक तसेच मानसिक छळ केल्याचा आरोप तिने केला आहे. खरंतर अनिकेत आणि स्नेहा हे मराठी सिनेसृष्टीतील क्यूट कपल म्हणून ओळखल गेलं होतं. स्नेहाही अभिनेत्री म्हणून या क्षेत्रात कार्यरत आहे. दोघेही एका क्षेत्रात असल्याने त्यांचे फार चांगले ट्यूनिंग होते. दोघांनी फार थाटामाटत लग्न केले होते.

 

अनिकेत आणि स्नेहा यांच्या लव्ह स्टोरीला सुरुवात झाली ती म्हणजे ‘ह्रदयात समथिंग समथिंग’ या सिनेमातून. या सिनेमा दोघांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. दोघांच्या लग्नात अनिकेतची सासू आणि मावशी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. दोघांची ओळख सिनेमाच्या सेट वर झाली होती या सिनेमात दोघेही प्रमुख भूमिकेत होते. त्यांच्यात छान मैत्री देखील झाली होती आणि याच दरम्यान स्नेहाच्या घरी लग्नासाठी स्थळं पाहण सुरू झालं होतं स्नेहाची आई आणि अनिकेतची मावशी या दोघीही पुण्यात एकाच बिल्डिंगमध्ये अनेक वर्षांपासून राहत होत्या.दोघीही एकमेकींच्या जिवलग मैत्रिणी. मग अनिकेतच्या मावशीनेच स्नेहाचे स्थळ अनिकेतसाठी सुचवले होते. दोघांनीही एकत्र सिनेमा केला होता त्यामुळे दोघांनीही हसत हसत लग्नासाठी होकार दिला होता. ह्रदयात समथिंग समथिंग या सिनेमाच्या प्रमोशनवेळ दोघांचा साखरपुडा देखील झाला होता. नंतर डिसेंबर २०१८मध्ये दोघेही विवाह बंधनात अडकले.

अनिकेत विश्वासराव हा मराठीतील लोकप्रिय अभिनेता आहेच. कळत नकळत घडते या मालिकेतून अनिकेत महाराष्ट्राच्या घराघरात पोहचला होता. त्याचप्रमाणे ये रे ये पैसा,फक्त लढ म्हणा, पोस्टर लर्ग,पोस्टर बॉईज ते हल्लीच प्रदर्शित झालेल्या बसस्टॉप या सिनेमात अनिकेतने दमदार अभिनय केलाय. तर स्नेहाच्या वर्क फ्रंटविषयी बोलायचे झाले तर स्नेहाने अनिकेतसोबत ह्रदयात वाजे समथिंग या सिनेमात काम केले आहे. त्याचप्रमाणे अभिनेता स्वप्निल जोशीच्या लाल इश्क या सिनेमातही स्नेहाने प्रमुख भूमिका साकारली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Radhika Chavan (@radhichavan)

स्नेहाची आई देखल अभिनेत्री असल्याचे फार कमी जणांना माहिती असेल. स्नेहाची आई राधिका चव्हाण या देखील अभिनेत्री त्याचप्रमाणे त्या कार्पोरेट क्षेत्रातही होस्ट म्हणून काम करतात. मेरे साई या हिंदी मालिकेत त्यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. राधिका या सोशल मीडियावर ही चांगल्या सक्रीय आहेत. अनेक रिल्स व्हिडिओ त्या करत असतात. काही विनोदी व्हिडिओ देखील त्या करत असतात. स्नेहा देखील तिच्या सोशल मीडियावर अनेकदा आपल्या सासूचे व्हिडिओ शेअर केले होते. मिलेगी मिलेगी या गाण्यावरचा त्यांचा डान्स व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता.


हेही वाचा – अभिनेता अनिकेत विश्वासराव विरोधात गुन्हा दाखल, पत्नीचे गंभीर आरोप