घरमनोरंजनबोनी कपूर आणि अनिल कपूर यांच्या नात्यात दुरावा!

बोनी कपूर आणि अनिल कपूर यांच्या नात्यात दुरावा!

Subscribe

बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेते आहेत ज्यांचं संपूर्ण कुटुंबच चित्रपटसृष्टीत कार्यरत आहे. त्यापैकीच एक म्हणजे कपूर घराणं. अनिल कपूर यांचा जन्म एका फिल्म निर्मात्याच्या घरात झाला. त्यानंतर अभिनेत्यानं सिनेसृष्टीत एन्ट्री घेतली. त्यांचे दोन्ही भाऊ सिनेसृष्टीत कार्यरत आहेत. लहान भाऊ संजय अभिनेता असून मोठा भाऊ बोनी कपूर निर्माता आणि दिग्दर्शक आहे. पण सध्या या दोन्ही भावांमध्ये दुरावा आल्याचं समोर आलं आहे. इतकच नाही तर अनिल कपूर यांनी बोनी कपूर यांच्यासोबत बोलणंही टाकलं असल्याचं स्वत: बोनी कपूर यांनी सांगितलं.

बोनी कपूर यांनी नुकतच्या दिलेल्या एका मुलखतीदरम्यान यासंदर्भात भाष्य केलं आहे. त्यामुळे सध्या या दोन्ही भावांमध्ये दुरावा असल्याचं समोर आलंय. इतकच नाही तर अनिल कपूर यांनी बोनी कपूर यांच्याशी सध्या कोणत्याही प्रकारचा संवाद केला नसल्याचं समोर आलं आहे. याचं कारण ठरलंय बोनी कपूर यांचा आगामी नो एन्ट्री हा सिनेमा. पण या सिनेमामुळे नेमकं या भावंडांमध्ये काय झालं याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.

- Advertisement -

दोन्ही भावंडांमध्ये अबोल्याचं ‘हे’ आहे कारण
अनिल आणि बोनी कपूर यांच्यात वाद निर्माण होण्यामागे एक सिनेमा कारणीभूत ठरला आहे. हा सिनेमा आहे नो एन्ट्री चा सिक्वेल. ‘नो एन्ट्री’ हा 2005 सालचा सुपरहिट चित्रपट आहे. त्याच्या सीक्वलची चर्चा खूप दिवसांपासून सुरू आहे पण त्यात जुनी कलाकार मंडळी असणार नाहीत. सलमान खानपासून फरदीन खानपर्यंत सगळ्या जुन्या कलाकारांना नवीन कलाकार रिप्लेस करणार आहेत. याच चित्रपटात अनिल कपूर यांना अभिनय करण्याची इच्छा होती, पण ते शक्य झालं नाही. चित्रपटावरून कपूर कुटुंबातील भावंडांमध्ये वाद झाला आहे. ‘नो एण्ट्री’च्या सीक्वेलमध्ये आपली भूमिकाच नाही, हे समजल्यावर अनिल कपूर यांनी नाराजी व्यक्त केली.

अनिल कपूर यांना ‘नो एण्ट्री’च्या सीक्वेलमध्ये काम करण्याची इच्छा होती. मात्र जेव्हा सीक्वेलच्या कलाकारांची नावं जाहीर झाली, तेव्हा त्यात त्यांचं नावंच नव्हतं. ही गोष्ट त्यांना बाहेरून समजली होती. त्यामुळे ते संतापले होते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बोनी कपूर यांनी या वादाचा खुलासा केला आहे. ‘झूम’ या वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोनी कपूर यांनी सांगितलं की सीक्वेलच्या कलाकारांची घोषणा झाल्यापासून भाऊ अनिल कपूर त्यांच्याशी बोलत नाहीये.

- Advertisement -

“भाऊ अनिल कपूरला नो एण्ट्रीच्या सीक्वेलविषयी आणि त्यातील कलाकारांविषयी मी काही सांगण्याआधीच तो माझ्यावर रागावला होता. कारण त्याला सांगण्याआधीच ऑनलाइन ही बातमी लीक झाली होती. ते लीक होणं दुर्दैवी होतं आणि त्यामुळेच आमच्यात वाद निर्माण झाले आहेत. त्याला नो एण्ट्रीच्या सीक्वेलमध्ये काम करायची खूप इच्छा होती, हे मला माहित आहे. पण त्यात त्याच्या भूमिकेसाठी जागाच नाही. मी हे का केलं आणि नेमकं काय झालं हे मला त्याला समजावून सांगायचं आहे, मला आशा आहे की हा वाद लवकरच संपेल.” असं बोनी कपूर म्हणाले.

नो एण्ट्री 2’ विषयी सांगायचं तर यात सलमान, फरदीन खान आणि अनिल कपूर यांची जागा वरुण धवन, अर्जुन कपूर आणि दिलजीत दोसांझ हे त्रिकूट घेणार आहे. ‘नो एण्ट्री 2’साठी वेगळ्या कलाकारांची निवड का केली, हे सांगताना बोनी कपूर पुढे म्हणाले,‘वरुण आणि अर्जुन खूप चांगले मित्र आहेत. चित्रपटात त्यांची केमिस्ट्री चांगली दिसेल. दिलजीतचा आज मोठा चाहतावर्ग आहे. मला हा सिनेमा आजच्या तरुण पिढीसाठी बनवायचा होता, म्हणून मी ही कास्टिंग केली.’ या चित्रपटामुळे भाऊ अनिल कपूर यांच्यासोबतच्या नात्यात वितुष्ट आल्याचं त्यांनी सांगितलं.

2005 मध्ये ‘नो एण्ट्री’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. ज्यामध्ये सलमान खान, फरदीन खान आणि अनिल कपूर यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट खूप गाजला होता. तेव्हापासून त्याच्या सीक्वेलची प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे. . ‘नो एण्ट्री 2’ या चित्रपटाच्या शूटिंगला डिसेंबर महिन्यात सुरुवात होईल. पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तब्बल 20 वर्षांनंतर हा सीक्वेल प्रदर्शित होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -