घरमनोरंजनAnil Kapoor : 'शक्ति' चित्रपट बघायला प्रेक्षक यायचे, पण...; अनिल कपूरची खंत

Anil Kapoor : ‘शक्ति’ चित्रपट बघायला प्रेक्षक यायचे, पण…; अनिल कपूरची खंत

Subscribe

मुंबई : रुपेरी पडद्यावर दोन दिग्गज अभिनेते समोरासमोर आणण्याचा अट्टाहास दोन वेळा करण्यात आला होता. ‘सौदागर’ आणि ‘शक्ति’ हे दोन चित्रपट होते. 1982 साली सुप्रसिद्ध दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी मेगास्टार अमिताभ बच्चन आणि ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना ‘शक्ति’ चित्रपटात एकत्र आणले होते. त्या काळातील हा सर्वात यशस्वी चित्रपट ठरला होता.

हेही वाचा – Ramayan : रामायण पुन्हा छोट्या पडद्यावर, प्रेक्षकांनी व्यक्त केला आनंद

- Advertisement -

या दोन दिग्गज फिल्मस्टार्सला समोरासमोर आणण्याची कल्पना प्रेक्षकांना थिएटरकडे खेचण्यासाठी पुरेशी होती. पण या चित्रपटात अनिल कपूरही होता. त्याने 1980मध्ये चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते आणि अभिनयाचा ठसा उमटवण्याचे त्याचे प्रयत्न सुरू होते. पण या चित्रपटात माझी कोणीही दखल घेतली नाही, असा खुलासा अनिल कपूरने अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’ या क्विझ रिॲलिटी शोमध्ये केला आहे.

अनिलने या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्या मुलाची भूमिका साकारली होती, ज्याबद्दल तो खूप उत्साही होता. याबद्दल तो सांगतो, लोकांनी थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपट पाहिला, पण त्याने माझ्या भूमिककडे पूर्णपणे दुर्लक्ष केले, अशी खंत त्याने व्यक्त केली. चित्रपटाच्या सुरुवातीला माझा एक सीन होता आणि त्यानंतर दिलीप कुमार (डीसीपी अश्विनी कुमार) हे आपला मुलगा विजय कुमार (अमिताभ बच्चन) याला गोळी मारल्यानंतर एक सीन होता. लोक चित्रपट बघायला उशिरा यायचे, त्यामुळे माझा सीन चुकायचा आणि अमिताभ बच्चन यांना गोळी लागल्यावर लोक थिएटरमधून बाहेर पडायचे, असे तो म्हणाला.

- Advertisement -

हेही वाचा – Rashmika Mandanna : …म्हणून ‘त्या’ व्हिडीओविरोधात आवाज उठवला, रश्मिकाकडून खुलासा

अरे, ज्याला आम्ही बघायला आलो होतो, त्या अमिताभला तर गोळी लागली आणि मग आता चित्रपट का बघायचा? असे प्रेक्षक म्हणायचे. हा चित्रपट त्या काळातील ब्लॉकबस्टर होता, जो आजही अनेक प्रेक्षकांच्या पसंतीचा आहे.
आजकाल अनिल कपूर एकामागून एक सुपरहिट चित्रपटांमध्ये दिसत आहे. गेल्यावर्षी Animal चित्रपटात त्याने रणबीर कपूरचे वडील बलबीर सिंग ही भूमिका केली होती. तर, सध्या तो फायटर चित्रपटात कॅप्टन राकेश जयसिंग ऊर्फ ​​रॉकीच्या भूमिकेत दिसत आहे. वयाच्या 67व्या वर्षीही अनिल पूर्वीप्रमाणेच आपल्या चित्रपटांबद्दल उत्साही दिसतो.

हेही वाचा – Munawar Faruqui : ‘बिग बॉस 17’ चा विजेता मुनव्वर फारुकीच्या चाहत्यावर पोलिसांची कारवाई, काय आहे प्रकरण?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -