लॉकडाऊनमध्ये प्रत्येक कलाकार घरात बसून काहीना काही उद्योग करत आहे. कोणी किचनमध्ये रमलय तर कोणी चित्र काढण्यात मात्र या सगळ्यात त्यांनी आपल्या व्यायामाकडे दुर्लक्ष केलेलं नाहीये. आजही ते आपल्या शरीराकडे अधिक लक्ष देतात. आपल्या फिटनेसचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. पण सध्या एका अभिनेत्याच्या फिटनेसच्या फोटोने सोशल मीडिया सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं आहे. हो, फोटो आहेत ६३ वर्षीय अनिल कपूर यांचे. आजही ते किती फिट आहेत इन्स्टाग्रामवरचे फोटो बघूनच समजतं. नुकतेच त्यांनी जिममधले काही फोटो शेअर केले. यात अनिल कपूर यांचे मसल्स पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं आहे.
जर तुम्हाला वाटतं की असं शरीर बनवण्यासाठी सप्लीमेन्टवर खूप जास्त पैसा खर्च करावा लागतो तर माझं उत्तर आहे नाही. मी सप्लीमेन्ट न घेता हे पिळदार शरीर बनवलं आहे. असं कॅप्शन देत अनिल कपूर यांनी हे फोटो शेअर केले आहेत. अनिक कपूर म्हणतात की, गेल्या सहा वर्षापासून मी यावर काम करत आहे. पण प्रत्येकवेळी काही ना काही अडचणी यायच्या. कधी सिनेमांचं चित्रीकरण तर कधी जाहीरातींच शूटींग व कुटुंबाला वेळ देण्याआधी या गोष्टी करायला वेळ मिळत नाहीत.
लॉकडाऊनमुळे वेळ मिळाला
कोरोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. पण या काळात नकारात्मक गोष्टी न करता सकारात्मक गोष्टी करण्याकडे लक्ष दिले पाहिजे. स्वतःचं शरीर सशक्त करा, रोगप्रतिकारशक्ती वाढवा, आपल्याला एवढा वेळ कदाचित आयुष्यात कधीच मिळणार नाही.
चाहते अनिल कपूर यांच्यावर फिदा
अनिल कपूर यांच्या या पोस्टला लाखो लोकांनी लाइक केलं. चाहत्यांसोबतच अनेक सेलिब्रिटींनीही या पोस्टवर कमेन्ट केल्या आहेत. नुकताच अनिल कपूर यांचा मलंग सिनेमा येऊन गेला. यात त्यांच्यासोबत आदित्य रॉय कपूर, कुणाल खेमू, दिशा पाटनी आणि एली एवराम होते.
हे ही वाचा – घ्या, ट्रम्प म्हणतात, किम जोंग कुठय माहितीये मला, पण मी सांगणार नाही!