घरताज्या घडामोडीअनिल कपूरचा 'थार' चित्रपट 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस

अनिल कपूरचा ‘थार’ चित्रपट ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस

Subscribe

बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर याचा आगामी चित्रपट ‘थार’ प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. नेटफ्लिक्सने ‘थार’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. ६ मे रोजी नेटफ्लिक्सवर ‘थार’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटात हर्षवर्धन कपूर, फातिमा सना शेख, सतीश कौशिक आणि अनिल कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात सस्पेन्स, मिस्ट्री आणि थ्रिलचा जबरदस्त मेळ आहे.

‘एके बनाम एके’ यानंतर ‘थार’ चित्रपटातून अनिल कपूर आणि हर्षची जोडी प्रेक्षकांच्या भेटीस येतेय. या चित्रपटात सिद्धार्थची कहाणी आहे, जो अलीकडेच झालेल्या हिंसक हत्येनंतर खूप व्यथित झाला असतो. जेव्हा या हत्येचा तपास करण्यासाठी सुरेखा सिंह नावाची स्थानिक पोलीस येते तेव्हा चित्रपट एका वेगळ्याच वळणावर जातो. ‘थार’ अनिल कपूर फिल्म कंपनीद्वारे निर्मित आणि राज सिंह चौधरी दिग्दर्शित आहे. या चित्रपटात पहिल्यांदाच हर्षवर्धन आणि फातिमाची जोडी दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Netflix India (@netflix_in)

- Advertisement -

दरम्यान ‘थार’ पूर्वीचे या तिन्ही स्टारने ओटीटी प्लेटफॉर्मवर आपले पदार्पण केले होते. अनिल कपूर ‘एके वर्सेज एके’मध्ये अनुराग कश्यपसोबत मुख्य भूमिकेत दिसला होता. तर सना फातिमा अनुराग बासूच्या ‘लूडो’ चित्रपटात दिसली होती. तसेच हर्षवर्धनने नेटफ्लिक्सच्या ‘रॉय’ चित्रपटातून ओटीटीवर पदार्पण केले होते.

अलीकडेच सोनम कपूरने गर्भवती असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे अनिल कपूरवर लवकरच आजोबा होणार आणि हर्षवर्धन मामा होणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – अभिनेत्री आएशा टाकियाचा नवरा आणि अबू आझमींचा मुलगा फरहानसोबत गोवा विमानतळावर गैरवर्तन


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -